लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर हे अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दमदार अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे.

काल, १ मार्चला महेश मांजरेकर दिग्दर्शित, निर्मित ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवळे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. याच चित्रपटामुळे महेश मांजरेकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच त्यांनी त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या जीवनपटाचं नाव काय असावं? याचा खुलासा केला आहे.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळी आईच्या आठवणीत झाले भावुक, म्हणाले, “पंधरा वर्षे झाली…”

‘लोकमत फिल्मी’शी बोलताना महेश मांजरेकरांनी स्वतःच्या जीवनपटाचं नाव सांगितलं. महेश मांजेरकरांना विचारण्यात आलं की, महेश मांजेरकरांवर जर चित्रपट आला तर त्याचं नाव काय असावं? असं तुम्हाला वाटतं. अभिनेते म्हणाले, “त्याचं नाव असावं, ‘मस्त'”

हेही वाचा – रिहानाच्या काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी मुकेश अंबांनींनी मोजले ‘इतके’ कोटी, वाचा मानधनाचा आकडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘ही अनोखी गाठ’ या चित्रपटानंतर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. या चित्रपटात खिलाडी अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विशाल निकम, विराट मडके, हार्दिक जोशी, सत्या मांजरेकर, अक्षय कुमार, नवाब खान आणि प्रवीण तरडे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.