मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे कायमच विविध कारणांनी प्रसिद्धीझोतात असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. सत्या मांजरेकरच्या या हॉटेलचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. आता अभिनेता आकाश ठोसरने सत्य मांजरेकरांच्या हॉटेलमधील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत स्वत: महेश मांजरेकर हे जेवण बनवताना दिसत आहेत.

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. या हॉटेलला नुकतंच आकाश ठोसरने भेट दिली. त्यावेळीचा एक व्हिडीओ आकाशने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.
आणखी वाचा : Video : करंदी, काळं चिकन अन् सोलकढी; सत्या मांजरेकरच्या हॉटेलमधून नीना कुळकर्णींनी ऑर्डर केलं जेवण, म्हणाल्या “पदार्थांची चव…”

या व्हिडीओत महेश मांजरेकर हे ‘सुका सुखी’ या हॉटेलच्या किचनमध्ये जेवण बनवताना दिसत आहेत. महेश मांजरेकर हे पदार्थाचा योग्य अंदाज घेत अगदी चविष्ट भाजी बनवताना दिसत आहेत.

आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

mahesh manjrekar cooking 1
महेश मांजरेकरांनी बनवलं जेवण

विशेष म्हणजे आकाश ठोसरने मांजरेकरांच्या हॉटेलमध्ये शाकाहारी जेवणावर ताव मारल्याचेही पाहायला मिळत आहे. बटाट्याची भाजी, वालाचं बिरडं, गवारची भाजी, चपाती, डाळ अशा विविध पदार्थांची चव आकाशने चाखल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला मांजरेकरांच्या ‘सुका सुखी’ हॉटेलमधील जेवणाची चव आवडल्याचे सांगत ‘मस्ट ट्राय’ असे लिहिलं आहे.

mahesh manjrekar cooking 2
महेश मांजरेकरांनी बनवलं जेवण

आणखी वाचा : “हे स्वप्न…” सत्या मांजरेकरच्या नव्या हॉटेलमागची कल्पना नेमकी कोणाची? नाव आलं समोर

दरम्यान सत्या मांजरेकरच्या या हॉटेलमध्ये आतापर्यंत अनेक मराठी कलाकारांनी अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चव या ठिकाणी चाखता येते. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर येताना दिसत आहेत.

Story img Loader