मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सतत काही ना काही कारणांनी चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली आहे. सत्या मांजरेकरच्या या हॉटेलचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच महेश मांजरेकरांनी ‘सुका सुखी’ या हॉटेलचे नाव सुरुवातीला वेगळं होतं, असा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकरांनी नुकतंच ‘राजश्री मराठी’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे हॉटेल का सुरु केलं, यामागची संकल्पना नेमकी काय होती, त्याचे नाव कसे ठरले, याबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी ‘सुका सुखी’ हॉटेलचं नाव वेगळं ठेवणार होते, असा खुलासा केला.
आणखी वाचा : ‘नाळ’ चित्रपटातील ‘मणी’च्या भूमिकेतील अभिनेता आहे प्रसिद्ध निर्मात्याचा मुलगा, कशी झाली निवड? जाणून घ्या किस्सा

“मी एखादं हॉटेल सुरु करावं, अशी माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती. आमच्या सीएची गोरेगावमध्ये ही जागा मोकळी होती. त्यामुळे मी मेधाला आपण ते सुरु करुया, असं म्हटलं. इथे सुकी मच्छी मिळते, म्हणून मी हॉटेलचं नाव सुका सुखी असं ठेवलं.

पण माझ्या मनात या हॉटेलचं नाव यायचं तर या असं होतं. कारण आम्ही जेवण चांगलं बनवतो, तुम्हाला यायचं तर या. आम्ही उगाचच तुम्हाला बोलवत नाही. पण नंतर मी विचार केला ही हे नाव फारच उद्धट वाटतंय, त्यामुळे मग मी ते नाव हॉटेलला दिलं नाही”, असे महेश मांजरेकरांनी सांगितले.

आणखी वाचा : निवेदिता यांनी दाखवली सराफ कुटुंबियांच्या फराळाची झलक, चव चाखताना अशोक सराफ म्हणाले “मी खाऊ…”

दरम्यान महेश मांजरेकरांच्या ‘सुका सुखी’ हा हॉटेलमध्ये मालवणी पद्धतीचे जेवण चाखायला मिळते. मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात त्यांचे हे हॉटेल आहे अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चवही तुम्हाला इथे चाखता येतात. आतापर्यंत अनेक कलाकारांनी सुका सुखी या हॉटेलच्या पदार्थांची चव चाखली आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh manjrekar decide different name to son satya manjrekar hotel suka sukhi but change it later nrp
Show comments