Juna Furniture box office collection : महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट २६ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांना भावुक करणारा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरीही करत आहे. चित्रपटाने तीन दिवसात किती कमाई केली, याची आकडेवारी समोर आली आहे.

‘जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !” हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु ती चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? असा प्रश्न उपस्थित करणारा हा सिनेमा आहे. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने, या चित्रपटाच्या कमाईची आकडेवारी दिली आहे.

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
jaideep ahlawat father died before paatal lok 2 release
‘पाताल लोक २’ प्रदर्शित होण्याआधी अभिनेता जयदीप अहलावतच्या वडिलांचे निधन
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
Ya goshtila Navach Nahi , cinema , pune ,
चंदेरी पडदा आणि गडद काळा अंधार
javed akhtar got Asian culture award
जावेद अख्तर यांचा २१ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात सन्मान, ‘हा’ पुरस्कार मिळाल्यावर म्हणाले, “हल्लीच्या चित्रपटांमध्ये…”
bandra terminus pit line
वांद्रे टर्मिनस येथे तीन पिट लाईन्सचे काम प्रगतीपथावर

“मी चवताळलेल्या माणसासारखा शोधून कानफटवेन”, ट्रोलिंगबद्दल महेश मांजरेकर संतापले; म्हणाले, “मी तुम्हाला…”

शुक्रवारी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ४० लाख कमावले, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ७७ लाख रुपये कमावले, तर रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने १.२ कोटी रुपयांची कमाई केली. तीन दिवसात चित्रपटाचं एकूण कलेक्शन २.१९ कोटी रुपये झालं आहे. ही अंदाजे आकडेवारी असून अधिकृत आकडेवारी आल्यास त्यात थोडा फरक असू शकतो.

श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”

दरम्यान, महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा आहे. गेले अनेक दिवस या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. कलाकारही सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहेत.

Story img Loader