दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे मिळत आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट कसा वाटला याबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. नुकतंच प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकरांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओत त्यांनी त्यांना बाईपण भारी देवा हा चित्रपट कसा वाटला, याबद्दल सांगितले आहे. तसेच त्यांनी मराठी चित्रपटांच्या प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. बाईपण भारी देवा, भारीच आहे बाबा हा सिनेमा! असे कॅप्शन त्यांनी या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : “आपल्याला बायकांच्या…” ‘बाईपण भारी देवा’ पाहिल्यानंतर आदेश बांदेकरांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मी नुकताच हा चित्रपट पाहिला. खूपच सुंदर चित्रपट आहे. तुम्ही आताच तो चित्रपट डोक्यावर घेतलाय. पण अजून तो डोक्यावर घेणं गरजेचे आहे, इतका हा चित्रपट चांगला आहे. सर्व काम बाजूला ठेवा आणि जाऊन हा चित्रपट पाहा.

केदार शिंदे तुझं विशेष अभिनंदन. खूपच छान चित्रपट आहे. निखिल साने तुझेही अभिनंदन कारण तू इतका चांगला चित्रपट निवडला. तुम्हाला वाटतं असेल ‘बाईपण भारी देवा’ म्हणजे फक्त बायकांचा चित्रपट असेल पण तसं नाही. हा चित्रपट पुरुषांनी पाहणं फार गरजेचे आहे. तुम्ही जरा तुमच्या बायकोला, मैत्रिणीला, बहिणीला जास्त समजून घेऊ शकाल. तुम्ही जरा समजुतदारपणे वागू शकाल”, असे महेश मांजरेकर म्हणाले.

आणखी वाचा : “ती समोर आली की…” केदार शिंदेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले “‘बाईपण भारी देवा’च्या निमित्ताने…”

“विशेष म्हणजे प्रेक्षकांचे अभिनंदन आणि आभार. कारण तुम्ही हे पटवून दिलंय की मराठी चित्रपट चांगले असतील तर प्रेक्षक नक्की येतात. धन्यवाद. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात सहा बायकांनी धुमाकूळ घातलाय. वंदना, सुचित्रा, रोहिणी, शिल्पा, सुकन्या, दिपा या सहा जणी फारच योग्य वाटतात. तुम्ही धिंगाणा घातलाय. तुम्हाला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेऊन नाचणार आहेत.”

“तसेच मला या चित्रपटाची लेखिका वैशाली नाईक. तिचे विशेष आभार मानायचे. तुझे या सिनेसृष्टीत स्वागत. तुझ्यासारख्या लेखकांची सिनेसृष्टीला गरज आहे. त्यामुळे जाऊन पटकन बघा ‘बाईपण भारी देवा'”, असेही आवाहन महेश मांजरेकरांनी केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh manjrekar reaction after watch baipan bhari deva kedar shinde movie nrp
First published on: 01-07-2023 at 20:08 IST