मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’ची कहाणी सांगणारा ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटासह आदिनाथ कोठारेचं कलाकार मंडळी भरभरून कौतुक करत आहेत. नुकतंच ‘पाणी’ चित्रपटाचं स्क्रिनिंग पार पडलं. यावेळी महेश मांजरेकर यांनी ‘पाणी’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आणि आदिनाथ कोठारेचं तोंडभरून कौतुक केलं.

‘राजश्री मराठी’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना महेश मांजरेकर म्हणाले, “जबरदस्त चित्रपट आहे. मला चित्रपट खूप आवडला. मी चित्रपट एन्जॉय केला. कोणाला असं वाटतं असेल की हा कलात्मक चित्रपट आहे. तर तसं नाहीये. खूप छान चित्रपट केला आहे. मी प्रेक्षकांना विनंती करतो की, सगळं काही सोडून हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासाठी जा. संवेदनशील विषयावर चित्रपट आहे आणि इतकं छान प्रकारे ते दाखवलं आहे. अजिबात हे सोप नाहीये.”

CBFC suggests cuts for Kangana Ranaut’s Emergency before release
Kangana Ranaut : ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा, कंगनाने पोस्ट करत दिली ‘ही’ माहिती
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Aishwarya Rai and Preity Zinta
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या राय व प्रीती झिंटाने ‘अनुपमा’फेम अभिनेत्याकडे केलेलं दुर्लक्ष; अनुभव सांगत म्हणाला…
women in the theater started making strange gestures
चित्रपट सुरू असताना भर थिएटरमध्ये महिला करू लागली विचित्र हावभाव; थरारक VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “हिच्या अंगात…”
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
mallika sherawat share harassement experience
“त्या हिरोला माझ्या बेडरूममध्ये…”, बॉलीवूड अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव; म्हणाली, “रात्री १२ वाजता…”
Phulvanti Marathi movie based on the novel
कादंबरीवर आधारित ‘फुलवंती’
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”

हेही वाचा – “डोळ्यातून बांध फुटला…”, वडील आणि भावाच्या आठवणीत अपूर्वा नेमळेकर झाली भावुक, म्हणाली…

“आदिनाथ कोठारे हट्स ऑफ. खूपच छान काम केलंय. सगळ्यांनीच भारी काम केलंय. छोट्या छोट्या भूमिका करणाऱ्यांनी गावकऱ्यांची व्यक्तिरेखा चांगली साकारली आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी अजिबात गैरसमज करून घेऊ नका की, कंटाळवाणा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहताना तुम्ही एन्जॉय कराल, शेवटपर्यंत हसाल असा ‘पाणी’ आहे. त्यामध्ये एक गोड प्रेमकथा सुंदर पेरली आहे. खूप दिवसांनंतर मला हा चित्रपट जास्त आवडला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी आणि हिंदी अनेक चित्रपट पाहिले. त्यामध्ये ‘पाणी’ चित्रपट हा उजवा आहे,” असं मांजरेकर म्हणाले.

मांजरेकरांनी आजकालच्या अभिनेत्रींना काय सल्ला दिला?

पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “आदिनाथने अशा विषयाचा पहिला चित्रपट करण्याचा प्रयत्न केला, हे खूपच भारी आहे. कारण हा चित्रपट दिग्दर्शित करणं कठीण आहे. एवढं मोठं युनिट सांभाळणं. चित्रपटात त्या बायका घेतल्या आहेत, त्या खरंच हॅट्स ऑफ आहेत. आजकालच्या सगळ्या अभिनेत्रींनी जाऊन काम कसं करावं हे त्यांच्याकडून शिकावं. इतक्या नॅचरल होत्या. सगळ्या अभिनेत्री चांगलंच करतात. पण काही पाठिंबा नसताना इतकं गोड काम केलंय. मला आदिनाथचं कौतुक यासाठीच वाटतंय की, हा विषय खूप कठीण होता. पण त्याने तो लीलया पेलला आहे.”

हेही वाचा – ‘सलमान खाननं आता दुसरा गुन्हा केला’, सलीम खान यांच्या टिप्पणीनंतर बिश्नोई समाजाचा संताप

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.