Mahesh Manjrekar : मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत, चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाहीत, मराठी सिनेमांना हिंदीमुळे फटका बसतो, मातृभाषेतील सिनेमांसाठी विशिष्ट समिती हवी अशा अनेक मागण्या गेल्या काही वर्षांत कलाकार व निर्मात्यांकडून केल्या जात आहेत. एकंदर मराठी चित्रपटांचं बॉक्स ऑफिसवरील आर्थिक गणित कोलमडल्याचं चित्र निर्माण झालं आहे. २०२२ च्या अखेरीस प्रदर्शित झालेला रितेश देशमुखचा ‘वेड’ आणि गेल्या वर्षी जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘बाईपण भारी देवा’ हे दोन मराठी चित्रपट वगळता अन्य कोणत्याच सिनेमाने ५० कोटींहून अधिक कमाई केलेली नाही. थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट अगदी १५ ते २० दिवसांत ओटीटीवर येतात. मराठी चित्रपटसृष्टीच्या या सद्यपरिस्थितीवर अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकरांनी ( Mahesh Manjrekar ) आपली रोखठोक मतं मांडली आहेत.

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘काकस्पर्श’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘नटसम्राट’, ‘जुनं फर्निचर’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. परंतु, गेल्या काही वर्षांत विशेषत: कोविडनंतर चित्रपटसृष्टीचं संपूर्ण गणित बदलल्याचं ‘कॅचअप’ या युट्यूब चॅनेलला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांनी सांगितलं. मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का यशस्वी ठरत नाहीत? मल्याळम सिनेमा तुलनेने प्रगल्भ का ठरतोय याबद्दल या ज्येष्ठ अभिनेत्याने ( Mahesh Manjrekar ) नेमकं काय म्हणणं मांडलंय जाणून घेऊयात…

Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Actor Makarand Anaspure Directed movie rajkaran gela mishit marathi movie roles
दिवाळीनंतर मकरंद अनासपुरेंचा नवरंगी धमाका
Director Nikhil Advani believes that artistic films will never disappear
‘कलात्मक चित्रपट कधीच लोप पावणार नाहीत…’; दिग्दर्शक निखिल अडवाणी
new ott release november
थिएटरमध्ये गाजलेले ‘हे’ सिनेमे OTT वर होणार प्रदर्शित, काही याच वीकेंडला पाहता येणार, वाचा यादी
Phullwanti on OTT
घरबसल्या पाहा प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ सिनेमा; ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर आहे उपलब्ध
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?
Bigg Boss Marathi Fame Nikhil Damle bought new car watch video
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम निखिल दामलेने खरेदी केली आलिशान गाडी, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

हेही वाचा : Bigg Boss Marathi : यंदाची थीम, ‘बिग बॉस’ करन्सी ते Dilemma! स्पर्धकांसाठी कोणते ट्विस्ट येणार? जाणून घ्या…

मल्याळम सिनेमा प्रगल्भ होत असताना मराठीचं घोडं कुठे अडतंय?

महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar ) सांगतात, “मल्याळम आणि मराठी सिनेमे प्रेक्षकांना नेहमीच काहीतरी वेगळं देतात आणि हे मीच नव्हे तर सगळेजण मान्य करतील. पण, आपण बॉक्स ऑफिसचा विचार केला तर मल्याळम चित्रपट तुफान चालतात… ती परिस्थिती मराठीची नाही. काही वर्षांपूर्वी मल्याळम सिनेमांची अवस्था मराठीपेक्षा वाईट अवस्था होती. मात्र, आता परिस्थिती एवढी बदललीये की, मल्याळम इंडस्ट्रीतले लोक आता २०० कोटींचा सिनेमा करतात.”

‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षभरात १० कोटींहून अधिक कमाई केलेले मराठी चित्रपट

१. बाईपण भारी देवा – ७६.२८ कोटी
२. सुभेदार – १४.१२ कोटी
३. झिम्मा २ – १० कोटी ६२ लाख
४. नाच गं घुमा – २३ कोटी ५५ लाख

मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर का कमाई करत नाहीत, नेमकं घोडं कुठे अडतंय? याबाबत महेश मांजेरकर ( Mahesh Manjrekar ) म्हणाले, “आपण म्हणतो प्रेक्षक येत नाहीत…असं नाहीये. ‘बाईपण भारी देवा’ला प्रेक्षक आले आपण सगळ्यांनी ते पाहिलं. त्यांना चित्रपटगृहांपर्यंत आणण्यासाठी काय करावं लागेल याचा विचार करावा लागणार आहे. कारण, मुंबईत एका बाजूला ४०० ते ५०० कोटींचे चित्रपट लागलेले असतात. अशा परिस्थितीत आपल्याला ३ ते ४ कोटींचा मराठी सिनेमा करावा लागतो. आपल्याकडे सुद्धा केजीएफ सारखा मोठा आणि सर्वांनाच आवडेल असा (मास) सिनेमा बनवणं आवश्यक आहे. १० लोक एकत्र येऊन आपण ५० कोटींचा सिनेमा नक्कीच करू शकतो. माझ्या डोक्यात अनेक ग्रँड विषय आहेत पण, बजेटचं काय असा प्रश्न येतो. हिंदीवाले आमचा चित्रपट फक्त महाराष्ट्रात चालला तरी हिट आहे असं म्हणतात. याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आपल्याकडे आहेत. फक्त ते चित्रपटगृहांपर्यंत पोहोचत नाहीयेत.”

हेही वाचा : वयात १८ वर्षांचं अंतर, लग्नाला विरोध ते सहजीवनाची ३५ वर्षे! अशोक व निवेदिता सराफ यांची सदाबहार प्रेमकहाणी

मराठी चित्रपटसृष्टीने एकत्र येणं गरजेचं – महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar )

दुसऱ्या इंडस्ट्रीमधले लोक काही होऊद्या सगळे एकत्र असतात. पण, आपल्याकडे असं नाहीये… मला फार वाईट वाटतं सांगायला की, अर्ध्याहून जास्त लोक चित्रपट लागल्यावर “पडला ना…?” याची आधीच चर्चा करायला खूप उतावीळ असतात. मी स्वत:मध्ये एक मोठा बदल केलाय तो म्हणजे आता मी ठरवून खास मराठी चित्रपट पाहायला सिनेमागृहात जातो. कारण, मला कोणी प्रश्न विचारला तुम्ही शेवटचा मराठी चित्रपट कोणता पाहिला? तर माझ्याकडे त्यांना देण्यासाठी उत्तर असलं पाहिजे. आपल्या चित्रपटांसाठी आपणच एकत्र आलं पाहिजे तेच जास्त गरजेचं आहे. याशिवाय हे लोक ( मल्याळम व हिंदी ) २०-२० कोटींचं प्रमोशन करतात…आपल्याकडे ५० लाखांचं प्रमोशन करण्यासाठी मारामारी होते. पण, आता सोशल मीडियावरील जाहिरातीमुळे थोडा प्रवास सोयीस्कर झाला आहे. मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत हे सगळं काल्पनिक आहे. कारण, थिएटरवाले फायदा पाहूनच चित्रपट लावतात. थिएटर मालक कोणाचेच नसतात… त्यांना त्यांचा फायदा महत्त्वाचा असतो. सिनेमा चालतोय, तर थिएटर मालकसुद्धा तेवढे शो वाढवतात. ‘नटसम्राट’, ‘जुनं फर्निचर’ माझ्या या चित्रपटांना स्क्रिन्स मिळवण्यासाठी मला अजिबात त्रास सहन करावा लागला नाही. आपोआप शो मिळत गेले.

Mahesh Manjrekar
महेश मांजरेकर ( Mahesh Manjrekar )

हेही वाचा : “…म्हणूनचं मी रडतेय”, महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाबद्दल दिली लेक गौरी इंगवलेने प्रतिक्रिया ( Mahesh Manjrekar )

कोविडमुळे इंडस्ट्रीचं नुकसान झालं

आजही महाराष्ट्रात अशी खूप गावं आहेत जिथे लोकसंख्या ५० हजारांहून अधिक आहे पण, त्या भागात एकही थिएटर नाहीये. जर त्याठिकाणी आपण चित्रपटगृह बांधलं तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल. तेवढ्या ५० हजार लोकांपर्यंत सिनेमा पोहोचेल. अनेकदा काही चित्रपट लाटेबरोबर निघून जातात. याबाबत एक उदाहरण देतो, माझा ‘पांघरुण’ चित्रपट अतिशय चांगला होता. कदाचित माझी प्रदर्शनाची वेळ चुकली असावी असं मला वाटतं. कारण, कोविड संपल्यावर लगेच मी तो चित्रपट प्रदर्शित केला त्यावेळी लोकांना कदाचित चित्रपटगृहांमध्ये जायची भीती वाटत होती किंवा तयारी नसावी. खरं सांगायचं झालं, तर कोविडमुळे फक्त मराठीच नव्हे तर संपूर्ण इंडस्ट्रीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ज्या लोकांना वेबसीरिज म्हणजे काय हे माहिती नव्हतं ते लोक या काळात ओटीटीकडे वळले. कारण, प्रेक्षकांकडे दुसरा पर्याय नव्हता. बरं, ओटीटीवर तुम्ही २ तास बघा किंवा २० तास बघा पैसे तेवढेच लागतात. यावर लोकांना वर्ल्ड सिनेमा देखील उपलब्ध झाला. त्यामुळे ओटीटी सोडून या प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आणण्यासाठी आता तुमच्या कंटेटमध्ये तेवढी ताकद पाहिजे. चित्रपटात स्टारच हवा हे सुद्धा महत्त्वाचं नाही याचं उदाहरण म्हणजे ‘मुंज्या’, एकंदर आजचा सिनेमा फक्त कंटेटवर चालतोय.

( Mahesh Manjrekar )
( Mahesh Manjrekar )

हेही वाचा : माधुरी दीक्षित : पाच फ्लॉप चित्रपट अन् एका ‘तेजाब’ने बदलली ‘धकधक गर्ल’ची कहाणी

“तमिळ, तेलुगू सिनेमे बाहेरगावी सुद्धा तुफान चालतात. मराठी सिनेमे आपण बाहेरगावी ठरवून लावतो. तसा प्रेक्षकवर्ग आपल्याला लाभलेला नाही. आपण मराठीमध्ये केलेला ३ ते ४ कोटींचा चित्रपट हिंदीत डब करून कोणी बघेल का? तर त्याचं उत्तर आहे ‘नाही’! अशात एखादा चित्रपट ५० कोटींच्या मास बजेटवर आपण करतोय तर तो निश्चित आपण डब करू शकतो. यशला ( दाक्षिणात्य सुपरस्टार ) आधी कोणी कर्नाटकात सुद्धा पाहायचं नाही पण, आता तो भारताचा स्टार झालाय. मग एखादा मराठी मुलगा भारताचा स्टार का होऊ शकत नाही? विजय सेतुपतीचा ‘महाराजा’ चित्रपट आज धुडगूस घालतोय…आपल्याकडे तर इतर लोकांपेक्षा जास्त टॅलेंट आहे. जर ‘सैराट’ आज रिलीज झाला असता तर, नागराजने पूर्ण भारतात प्रदर्शित केला असता. त्यावेळी डबिंगची एवढी काही क्रेझ नव्हती…पण, ‘सैराट’ हिंदी डबमध्ये पण तेवढाच चालला असता. त्यामुळे मराठीत एका अशा सिनेमाची गरज आहे जो सिनेमा प्रत्येक मराठी माणसाला आत्मविश्वास देईल… हे एकदा झालं की मग मराठीला कोणीही रोखू शकत नाही” असं मत महेश मांजरेकरांनी ( Mahesh Manjrekar ) मांडलं आहे.