एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जाळे आता सर्वत्र वेगाने पसरत आहे. या एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लेखन, फोटो एडिटिंग, व्हिडीओ एडिटिंग अशा बऱ्याच काही गोष्टी सहजरित्या केल्या जाऊ शकतात. सध्या एआयच्या मदतीने तयार केलेले फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. अशातच एआयने तयार केलेला महेश मांजरेकरांच्या जबरदस्त लूकचे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
लोकप्रिय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. या माध्यमातून ते प्रत्येक घडामोडींवर भाष्य करत असतात. नुकताच त्यांनी एआयने तयार केलेला त्यांचा जबरदस्त लूक शेअर केला आहे. तसेच मांजरेकरांनी लिहिलं आहे की, “एआयच्या गावात. माझा असा लूक असावा, अशी माझी इच्छा होती. सर्व खलनायकांची भागमभाग.” एका डिजिटल क्रिएटरला तो फोटो टॅग करून ‘तू सॉलिड आहेस’, असंही त्यांनी पुढे लिहिलं आहे. महेश मांजरेकरांच्या या एआयने तयार केलेल्या लूकवर बऱ्याच कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हेही वाचा – ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटातील अभिनेत्रीने उरकला साखरपुडा; फोटो शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
हेही वाचा – सलमान खानचे फॉलोवर्स कमी झाले म्हणून राखी सावंत भडकली; व्हिडीओ झाला व्हायरल
अमृता खानविलकरने लिहिलं आहे की, “कडक सर.” तर अमृता देशमुखने “इट इज हॉट” असं लिहिलेलं जीआयएफ प्रतिक्रियेत पोस्ट केलं आहे. तसेच माधव देवचक्के, तेजस्वी लोणारी, विशाल निकम, विकास पाटील या कलाकार मंडळी सुद्धा मांजरेकरांच्या फोटो प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”
दरम्यान, महेश मांजरेकरांच्या कामाबद्दल बोलायचं तर, काही महिन्यांपूर्वी त्यांची ‘एका काळेचे मणी’ ही मराठी वेबसीरिज प्रदर्शित झाली होती. तसेच याआधी ते ‘बटरफ्लाय’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आले होते.