प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी काही दिवसांपूर्वीच ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा केली. त्यांनतर या चित्रपटावरून सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे. त्यावर आक्षेप घेतला जात आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या स्टार कास्टलाही विरोध केला जात आहे. या चित्रपटात सात मावळ्यांपैकी एका मावळ्याच्या भूमिकेत महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर दिसणार आहे. पण त्याच्या या भूमिकेला विरोध होताना दिसतोय छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून सत्य मांजरेकर भूमिकेत योग्य वाटत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. अशात आता वेगळ्याच कारणाने सत्य मांजरेकर सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये दिसणार असल्याने चर्चेचा विषय ठरलेला सत्य मांजरेकरच्या रिलेशनशिपबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीच सत्यने त्याच्या इन्स्टाग्रामवर एका मुलीबरोबर फोटो शेअर केला होता. ज्यामुळे तो या मुलीला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. या फोटोवरील कॅप्शनमुळे सत्याला अनेकांनी रिलेशनशिपबाबत प्रश्नही विचारले आहेत.
आणखी पाहा- ‘वेडात मराठे वीर दौडले सात’मध्ये ऐतिहासिक भूमिकेत झळकणारा सत्य मांजरेकर नेमका आहे तरी कोण?
सत्याने इन्स्टाग्रामवर जिच्याबरोबर फोटो शेअर केले आहेत त्या मुलीचं नाव श्रुतिका शिंदे असं आहे. श्रुतिकाबरोबरचा फोटो शेअर करताना त्याने या फोटोला “फॉरएव्हर अँड ऑलवेज” असं कॅप्शन दिलं आहे. श्रुतिकाबरोबर सत्यने इन्स्टाग्रामवर आणखीही काही फोटो शेअर केले आहेत. पण या फोटोवर त्याचं कॅप्शन पाहून एका युजरने त्याला “तू तिला डेट करतोयस का?” असा प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना सत्यने, “ती माझी चांगली मैत्रीण आहे” असं लिहिलं आहे. याशिवाय आणखी एका युजरने, “तुम्हाला एकत्र पाहून आनंद झाला” अशी कमेंट केली आहे. ज्यावर सत्यने, “आम्ही रिलेशनशिपमध्ये नव्हतो. ती फक्त चांगली मैत्रीण आहे” असं उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा- “मी २०१८ पासूनच निश्चित होतो कारण…” महेश मांजरेकरांच्या लेकाने सांगितला पडद्यामागचा किस्सा
दरम्यान सत्यने युजर्सच्या कमेंट्सना दिलेल्या उत्तरावरून तरी तो श्रुतिकाला डेट करत नसल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर या चर्चा थांबल्या. सत्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने बालकलाकार म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली होती. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आई’ या चित्रपटात तो दिसला होता. त्यानंतर त्याने ‘जाणिवा’, ‘पोरबाजार’ या चित्रपटांमध्ये काम केलं. याशिवाय त्याने ‘फन अनलिमिटेड’, ‘वाह लाइफ हो तो ऐसी’, ‘१९६२ द वॉर इन द हिल्स’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.