सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. सध्या ते त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. तर दुसरीकडे त्यातच आता महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने हॉटेल व्यवसाय सुरु केला आहे. आता त्याने यामागची नेमकी संकल्पना कोणाची होती, यामागचा खुलासा केला आहे.

महेश मांजरेकरांचा मुलगा सत्या मांजरेकरने काही दिवसांपूर्वी नवीन सुरुवात केली आहे. त्याने मुंबई उपनगरातील गोरेगाव परिसरात स्वत:चे हॉटेल सुरु केले आहे. ‘सुका सुखी’ (Suka Sukhi) असं सत्याच्या हॉटेलचं नाव आहे. नुकतंच यानिमित्ताने त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने अनेक खुलासे केले आहेत.
आणखी वाचा : पहिला प्रपोज ते सेलिब्रिटी क्रश, नागराज मंजुळेंनी केला खुलासा; म्हणाले “आता सांगण्यात…” 

eco-friendly Ganeshotsav concept
ठाणेकरांचा पर्यावरणपुरक गणेशोत्सव संकल्पनेला प्रतिसाद
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
Abhishek Ghosalkar murder case, CBI,
अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, मुंबई पोलिसांच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाचे बोट
abortion, rape victim, High Court,
गर्भपात करावे की नाही हा सर्वस्वी बलात्कार पीडितेचा अधिकार, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
documentary making, Abhijit Kolhatkar, Shilpa Godbole, producer director duo, documentary, Urdu ghazal, Shashikala Shirgopikar, Reverb Production, passion project, artistic journey
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : अद्यायावतीकरणाचा उद्योग…
paradise painting venice loksatta article
कलाकारण: जुन्या कलेच्या (आणि व्यवस्थेच्याही) चिंध्या…
Badlapur sexual assault case,
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण: आरोपीच्या चारित्र्याविषयी माहिती गोळा करण्याचे काम सुरू

सत्या मांजरेकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर दोन फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातील एका फोटोत सत्या हा हॉटेल बाहेर उभा असल्याचे दिसत आहे. तर व्हिडीओत सत्याने हॉटेलमधील जेवणाच्या काही खास पदार्थांची झलक दाखवली आहे. या कॅप्शन देताना सत्याने या मागची संकल्पना कोणाची होती, याचा खुलासा केला आहे.

“‘सुका सुखी’ हे सुरु करण्याची कल्पना आणि स्वप्न हे माझ्या वडिलांनी पाहिले होते. घरगुती पदार्थ लोकांना खायला मिळावेत हे यामागचे कारण होते. त्यामुळेच आम्ही ‘सुका सुखी’ची सुरुवात केली. पौष्टिक, स्वादिष्ट आणि घरगुती अन्न पोहोचण्यासाठी आम्ही हा मार्ग निवडला”, असे सत्याने या फोटोला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटातून महेश मांजरेकरांचा मुलगा सत्यची एक्झिट? एका व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

दरम्यान सत्या मांजरेकरने सुरु केलेल्या या हॉटेलमध्ये अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. अनेक शाकाहारी आणि मासांहारी पदार्थांची चवही तुम्हाला इथे चाखता येणार आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही समोर येताना दिसत आहेत.