सध्या मराठीमध्ये एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या बाईपण भारी देवा चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. नुकताच नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ व सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये. मराठीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजेकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत मराठी चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रतिसादावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

हेही वाचा- “कारस्थानी वर्चस्ववाद्यांना बहुजनांमधले भ्रष्टाचारी लोक…”, मनोज जरांगे पाटलांच्या साताऱ्यातील सभेच्या पार्श्वभूमीवर किरण मानेंची पोस्ट

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
Rajdutta
६० वर्षांपूर्वी ‘इतक्या’ रुपयांत बनायचे चित्रपट; ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांचा खुलासा, म्हणाले…
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”

महेश मांजरेकर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. अनेकदा ते मराठी चित्रपटांबद्दल आपलं मत व्यक्त करत असतात. नुकताच त्यांनी नागराज मंजुळे यांचा ‘नाळ २’ व सुजय डहाके दिग्दर्शित ‘श्यामची आई’ चित्रपट बघितला. या चित्रपटांना प्रेक्षक येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. मांजरेकरांनी याबाबत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं. “नालायक चित्रपट बघतोच आपण त्याबरोबर नाळ २ पण बघूयात ना अप्रतिम आहे.”

हेही वाचा- ‘देऊळ’मधील ‘त्या’ संवादाची आठवण काढणाऱ्या चाहत्याची हृषिकेश जोशींनी घेतली दखल; म्हणाले, “यांना दंडवत…”

महेश मांजरेकर म्हणाले “मी ‘नाळ २’ नवाचा चित्रपट पाहिला. मराठी चित्रपट इतका चांगला बनतो, याचा मला अभिमान वाटला. मला एका गोष्टीचं मात्र वाईट वाटलं, ते म्हणजे आपले मराठी चित्रपट पाहायला फार कमी प्रेक्षक येतात. पण का याचं मला कारण कळालेलं नाही. महाराष्ट्रात इतके अप्रतिम चित्रपट बनतात, पण कोणी प्रेक्षक येत नाही. माझं तर म्हणणं आहे की ज्याचं नशीब वाईट असेल, त्याच्या नशिबातच हा चित्रपट नाही.

पुढे ते म्हणाले, “आपण कन्नड चित्रपट हिंदी डब करतो आणि ते बघून हिट करतो. कांतारा, पुष्पा, RRR सारखे चित्रपट हिट होतात. माझी मराठी निर्मात्यांना एकच म्हणणं आहे की, त्यांनी आपले चित्रपटही डब करावेत. मराठी आणि हिंदीत फार फरक नाही त्यामुळे ते तस वाईटही दिसणार नाही. ‘नाळ २’ हा देशभरात सगळ्यांनी बघितला पाहिजे. ज्यातील तीन लहान मुलांनी खूप सुंदर काम केलं. उद्या या चित्रपटाला पुरस्कारासाठी नामांकने मिळाली, तर यातील त्या ‘चिमी’ला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार न देता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात यावा. कारण, कलाकार हा कलाकारच असतो. तो बालकलाकार मोठा कलाकार नसतो.”

हेही वाचा- “तू कधीच पत्नीचं कौतुक करत नाहीस,” गश्मीर महाजनी चाहत्याला उत्तर देत म्हणाला, “खूप कमी लोक…”

मांजरेकर पुढे म्हणाले, मी ‘श्यामची आई’ नावाचा वेगळ्याच धाटणीचा चित्रपट पहिला. मराठी चित्रपट काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करत आहेत.माझी सर्व मराठी प्रेक्षकांना विनंती आहे, की सरसकट सगळे मराठी चित्रपट बघा. असं माझं म्हणणं नाही पण ज्यावेळेला एखादा चांगला मराठी चित्रपट येतो, त्याला तुम्ही पाठिंबा द्या. मला हे दोन्ही चित्रपट बघून खूपच अभिमान वाटला. मी पुन्हा एकदा मराठी निर्मात्यांना विनंती करतो की, जर तुम्हाला वाटतं की, तुमचा चित्रपट चांगला आहे. तर तो चित्रपट हिंदीत डब करून देशभरात प्रदर्शित करावा. आपला मराठी चित्रपट आशयाच्या बाबतीत आज कुठे आहे, हे सर्वांना कळलं पाहिजे.”

Story img Loader