Manasi Moghe : लग्न असो किंवा आयुष्यातील सुंदर क्षण… अलीकडच्या काळात सेलिब्रिटी आपल्या वैयक्तिक जीवनातील आनंदाचे क्षण नेहमीच चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. मराठी कलाविश्वातील अशाच एका लोकप्रिय अभिनेत्रीने प्रेक्षकांना गुडन्यूज दिली आहे. ही अभिनेत्री येत्या काही दिवसात आई होणार आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाचं औचित्य साधत या अभिनेत्रीने सोशल मीडियावर गरोदर असल्याचं जाहीर केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ख्वाबों के परिंदे’, ‘यारीया २’ यांसारख्या हिंदी चित्रपटांसह या अभिनेत्रीने ‘ऑटोग्राफ’, ‘बुगडी माझी सांडली गं’ चित्रपटांमध्ये देखील काम केललं आहे. तिचं नाव आहे मानसी मोघे. मराठमोळ्या मानसी मोघेने २०१३ मध्ये ‘मिस Dive युनिव्हर्स’ हा खिताब देखील जिंकला होता. अभिनेत्री ( Manasi Moghe ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या पतीसह ती अनेक नवनवीन जागांवर भ्रमंती करताना दिसते.

हेही वाचा : रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”

सुंदर फोटोशूट करत केली प्रेग्नन्सीची घोषणा

मानसी मोघेने गेल्यावर्षी हिंदी अभिनेता सूर्या शर्माशी लग्नगाठ बांधली. ‘अनदेखी’, ‘ये काली काली आँखे’, ‘होस्टेजेस’, ‘ब्राउन’ अशा लोकप्रिय सीरिजमध्ये सूर्याने काम केलेलं आहे. मानसी आणि सूर्याचा विवाहसोहळा गेल्यावर्षी थाटामाटात पार पडला होता. तिच्या लग्नाच्या फोटोंवर कलाविश्वातील असंख्य कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. मानसी आणि सूर्या यांचा विवाहसोहळ्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता वर्षभराने नुकताच या जोडप्याने त्यांच्या लग्नाच्या पहिला वाढदिवस साजरा केला. यावेळी अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यातील एक अत्यंत आनंदाची बातमी तिच्या सर्व चाहत्यांबरोबर शेअर केली.

मानसी मोघे ( Manasi Moghe ) लिहिते, “आज आमच्या लग्नाच्या पहिला वाढदिवस…या खास दिवशी आम्ही तुमच्याबरोबर एक खास गोष्ट शेअर करत आहोत. लवकरच आमच्या घरी चिमुकल्या सदस्याचं आगमन होणार आहे. New Baby Coming Soon.” सूर्या आणि मानसी यांनी गुडन्यूज देतानाची पोस्ट शेअर करताना काही हटके फोटो देखील शेअर केले आहेत. यामध्ये दोघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घालून Twinning केल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोवरचं ‘Arriving in 2025’ असं कॅप्शन वाचून हे जोडपं पुढच्या वर्षी बाळाचं स्वागत करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : “केरळ फिरतोय, पैसे फुकट गेले…”, ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्याची उपरोधिक पोस्ट; नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस

दरम्यान, मानसी मोघेच्या ( Manasi Moghe ) पोस्टवर कमेंट करत समृद्धी केळकर, मौनी रॉय, पारुल गुलाटी, हरलीन सेठी यांसह अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manasi moghe marathi actress announces pregnancy on her first anniversary shares beautiful photos sva 00