मानसी नाईक पुन्हा एकदा प्रेमात पडल्याच्या चर्चांना उधाण आलंय. मानसीने तिचा वाढदिवस पॅरिसला साजरा केला होता तेव्हा तिला पॅरिसमध्ये बर्थडे सरप्राईज देण्यात आलं होतं. मानसीच्या डोळ्यांवर पट्टी बांधून तिला आयफेल टॉवरच्या इथे नेण्यात आलं होतं. याचबरोबर मानसीला फॉसिल वॉच बर्थडे गिफ्ट म्हणून मिळालं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसीच्या या बर्थडे ट्रीपबाबत विचारलं असता ‘हंच मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत मानसी म्हणाली होती की, “मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन. पण बरं वाटलं की, असा कोणीतरी आहे; जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो.”

आता पुन्हा एकदा मानसीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर त्या खास व्यक्तीचा फोटो रिपोस्ट करून जणू प्रेमाची कबूली दिली आहे. राहुल खिसमतरावने मानसी आणि त्याचा रोमॅंटीक फोटो शेअर केला आहे. मागे आयफेल टॉवर आणि दोघांचा सेल्फी असा परिपूर्ण करणारा हा फोटो आहे. “माझं प्रेम मी एका फ्रेममध्ये कॅप्चर करत आहे” असं कॅप्शन राहुलने या स्टोरीला दिलं आहे.

हेही वाचा… मातीचं घर, विटांची चूल अन्…, मृण्मयी देशपांडेने पतीसह शेतात बांधलं घर

मानसी आणि राहुल रिलेशनमध्ये असल्याचं जरी दिसून येत असलं तरी अद्याप मानसीने याबाबत कोणताही खुलासा केला नाही आहे. लवकरच ही गुड न्यूज सगळ्यांसमोर येईल अशी अपेक्षा तिच्या चाहत्यांची आहे. मानसीचा कथित बॉयफ्रेंड अंतराळ शास्त्रज्ञ आहे. मानसी जर्मनीमध्ये स्थित होणार असल्याचं म्हणाली. जर्मनीत गेल्यावर अभिनेत्री पूजा सावंतला आमंत्रण असेल आणि सगळं मराठमोळं असेल, असंही ती अप्रत्यक्षपणे म्हणाली. लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल मानसी हे सगळं म्हणतेय अशा या वक्तव्यावरून समजलं जात आहे.

हेही वाचा… डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर अन् ‘ती’ आठवण; जयंतीनिमित्त गौरव मोरेने शेअर केला खास फोटो

दरम्यान, मानसीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झाल्यास, जानेवारी २०२१ मध्ये मानसीने बॉक्सर प्रदीप खरेराशी लग्नगाठ बांधली होती; पण दीड वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. याबद्दल अनेक मुलाखतींमध्ये मानसीने स्पष्ट केलं आहे. आता मानसी पुन्हा एकदा प्रेमात पडलीय आणि लवकरच ती लग्न करून जर्मनीला सेटल होईल अशा चर्चा सुरू आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manasi naik boyfriend rahul khismatrao shared romantic photo of them with eiffel tower paris dvr