मराठी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती सोशल मीडियावर आपले फोटो व व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. बऱ्याचदा ती फोटोंसह सकारात्मक विचारही शेअर करत असते. मानसी नाईक तिच्या डान्ससाठी खूप लोकप्रिय आहे. आता मानसीने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओत एका जुन्या गाण्यावर तिच्या दिलखेचक अदा पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मानसी नाईकने ज्या गाण्यावर डान्स केला, ते गाणं २००३ साली आलेल्या ‘अंदाज’ चित्रपटातील आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता यांच्या भूमिका होत्या. हे गाणं अक्षय कुमार व प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. यामध्ये दोन्ही स्टार्सचा रोमान्स पाहायला मिळाला होता. याच गाण्यावर आता मानसी नाईक थिरकली आहे.

पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्यानंतर मानसी नाईकची पहिली पोस्ट, शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

व्हिडीओमध्ये दिसतंय की मानसी नाईकने हिरव्या काठांची पिवळी सुंदरशी साडी नेसली आहे. याबरोबरच तिने हातात हिरवा चुडा घालून पारंपरिक लूक केला आहे. याच लूकमध्ये तिने हा व्हिडीओ बनवला आहे. यात ती ‘आएगा मजा अब बरसात का, तेरी मेरी दिलकश मुलाकात का’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तुझ्या कल्पनाविश्वातला महत्त्वाचा घटक नेहमी मीच असेन, अशा आशयाचं कॅप्शन मानसीने या व्हिडीओला दिलं आहे.

हातात हिरवा चुडा, पिवळी साडी अन्…; मानसी नाईक Photos शेअर करत म्हणाली, “मला झालेला त्रास…”

या व्हिडीओतील मानसीच्या अदा पाहून चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहींनी यावर ‘कमाल मानसी नाईक,’ ‘खूपच सुंदर ताई’, ‘कडक’, ‘खूप सुंदर एक्सप्रेशन,’ अशा कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. त्याचवेळी काही जणांनी मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या साखरपुड्याचा कमेंट्समध्ये उल्लेख केला आहे. ‘तिकडे मॅडमच्या एक्स पतीने साखरपुडा केला,’ ‘मोकळी झाली तू, फारकत घेऊन’ अशा कमेंट्सही मानसीच्या या पोस्टवर आहेत.

मानसी नाईकच्या व्हिडीओवरील कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट्स)

मानसी नाईकच्या पूर्वाश्रमीच्या पतीने केला साखरपुडा

‘वाट बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावणारी मानसी नाईक तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. लग्नानंतर अवघ्या दीड वर्षांत तिचा घटस्फोट झाला. तिने बॉक्सर व सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर प्रदीप खरेराशी लग्न केलं होतं. मानसीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्यावर प्रदीपने विशाखा जाटनी हिच्याशी नुकताच साखरपुडा केला आहे. विशाखा जाटनी हीदेखील सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manasi naik dance on akshay kumar priyanka chopra romantic song video viral hrc