Pradeep Kharera Engaged: मराठी अभिनेत्री मानसी नाईकच्या (Manasi Naik) पूर्वाश्रमीच्या पतीने साखरपुडा केला आहे. प्रदीप खरेरा याच्या साखरपुड्याचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. त्याने एका सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरशी नुकताच साखरपुडा केला. प्रदीप खरेराच्या होणाऱ्या पत्नीने शेअर केलेल्या या पोस्टवर कमेंट करून युजर्स त्यांना शुभेच्छा देत आहेत.

प्रदीप हा एक बॉक्सर असून तो मॉडेलिंग क्षेत्रातही कार्यरत आहे. तो सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. त्याच्या अकाउंटवर बॉक्सिंग व मॉडेलिंगबद्दलचे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात. आता प्रदीपच्या साखरपुड्याच्या व्हिडीओने लक्ष वेधून घेतले आहे. प्रदीपच्या होणाऱ्या पत्नीचे नाव विशाखा जाटनी आहे. तिनेच प्रदीप खरेराला टॅग करत हा व्हिडीओ शेअर केला आहे.

reelstar danny pandit got married to neha kulkarni
रीलस्टार डॅनी पंडितने केलं लग्न, त्याची ‘खऱ्या आयुष्यातील अर्धांगिनी’ पाहिलीत का?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Maharashtrachi HasyaJatra Fame shivali parab revealed her crush Rohit mane
“मला दुसरं लग्न करावं लागतंय”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सावत्या असं का म्हणाला? जाणून घ्या…
actress Ayushi Khurana married to Suraj Kakkar
पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लोकप्रिय सेलिब्रिटी जोडपं अडकलं लग्नबंधनात, फोटो आले समोर
Pimpri-Chinchwad:, Husband girlfriend beaten,
पिंपरी-चिंचवड: नवऱ्याच्या प्रेयसीला आणि मध्यस्थी करणाऱ्या महिलेला पत्नीने घडवली अद्दल; प्रकरण थेट पोलीस ठाण्यात
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?
why Shatrughan Sinha married Poonam despite his affair with Reena Roy
रीना रॉयबरोबर अफेअर असूनही पूनमशी लग्न का केलं? शत्रुघ्न सिन्हा म्हणालेले, “निर्णय घेणं…”
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

दीपिका पादुकोणसह केले इंटिमेट सीन, अभिनेता तोच सिनेमा आई-वडिलांबरोबर पाहण्यासाठी गेलं अन्…

प्रदीप व विशाखा यांनी साखरपुड्यासाठी खास लॅव्हेंडर रंगाच्या कपड्यांमध्ये ट्विनिंग केलं. या व्हिडीओमध्ये दोघांच्या अंगठ्यांची झलक पाहायला मिळते. तसेच ते दोघे रोमँटिक पोज देताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. विशाखा पनवर हिने “फायनली इंगेज्ड व वी डिड इट” असं कॅप्शन लिहून हा व्हिडीओ शेअर केला आहे. याचबरोबर तिने अंगठी व रेड हार्ट इमोजी वापरले आहेत.

प्रदीप विशाखा यांचा साखरपुड्याचा व्हिडीओ पाहून नेटकरी त्यांना शुभेच्छा देत आहेत. अनेक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरही कमेंट करून नवीन प्रवासासाठी त्यांचे अभिनंदन करत आहेत.

“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

कोण आहे विशाखा जाटनी?

विशाखा जाटनी (who is Vishaka Jaatni ) हिचे नाव विशाखा पनवर असून ती प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास सात मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने व प्रदीपने सेल्फी नावाचं एक गाणं एकत्र केलं आहे.

मानसी नाईक व प्रदीप खरेरा घटस्फोट

मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी जानेवारी २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली होती. सुरुवातीला त्यांचा सुखाचा संसार सुरू होता, दोघेही एकमेकांबरोबर फिरायला जायचे, फोटो व व्हिडीओही शेअर करत असायचे. पण अचानक संसारात वादळ आलं आणि अवघ्या दीड वर्षातच त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर काही काळातच प्रदीपने विशाखाशी साखरपुडा केला आहे. दुसरीकडे मानसीही राहुल खिसमतरावला डेट करत असल्याची चर्चा आहे.

“त्याने पँटची चैन उघडली अन्…”, मदत मागितल्यावर कारमध्ये बॉलीवूड अभिनेत्रीला आला भयंकर अनुभव

घटस्फोटाबद्दल काय म्हणाली होती मानसी नाईक?

“आमच्यात नेमकं काय चुकलं हे सांगणं आता माझ्यासाठी कठीण आहे. आमच्यात काही गोष्टी ठीक होऊ शकल्या नाहीत. पण हे सगळं खूपच वेगाने घडलं. आजही माझा प्रेमावर विश्वास आहे. मला पुन्हा प्रेम करायचं आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा मला माझं कुटुंब हवं होतं आणि त्यामुळे मी लग्न केलं. पण सर्व खूपच घाईघाईत झालं. मला वाटतं कदाचित तिथेच काहीतरी चुकलं,” असं मानसी घटस्फोटानंतर दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.

Story img Loader