मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक व पती प्रदीप खरेरा एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळे होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विभक्त होणार असल्याच्या चर्चांवर अखेर मानसीने मौन सोडत घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती दिली आहे.
मानसी नाईक व प्रदीप खरेरा १९ जानेवारी २०२१ रोजी विवाहबंधनात अडकले होते. बॉक्सर व मॉडेलिंग करत असलेल्या पतीसह मानसीचा सुखाचा संसार सुरू होता. परंतु अचानक त्यांनी इन्स्टाग्रामवरुन एकमेकांना अनफॉलो केल्याने दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर मानसीनेच याबाबत ‘हिंदुस्थान टाइम्स’शी बोलताना घटस्फोट घेणार असल्याचा खुलासा केला.
हेही वाचा >> रश्मिका मंदाना व विजय देवरकोंडाने गुपचूप उरकलं लग्न? फोटो व्हायरल
वाट बघतोय रिक्षावला, गुलाबी नोट, बाई वाड्यावर या यांसारख्या गाण्यांतून प्रसिद्धी मिळवलेली मानसी तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. मानसी नाईकने तिच्या जीम ट्रेनरसह ‘राजश्री मराठी’ला तिने मुलाखत दिली होती. यावेळी प्रदीप अथलेट असूनही तू फिटनेससाठी त्याच्याकडून मार्गदर्शन का घेत नाहीस, असा प्रश्न मानसीला विचारण्यात आला होता. यावर उत्तर देत “त्यामागचं एकच कारण आहे. नवरा जीम ट्रेनर असेल तर तुमचे लाड पुरवले जातात. मी वर्कआऊट करताना आज २५ किलो वजन नाही उचलत असं जर म्हणाले तर त्यावर तो ठीक आहे, असं उत्तर देईल. त्यामुळे वर्कआऊट करायला प्रोत्साहन मिळणार नाही” असं मानसी म्हणाली होती.
हेही वाचा >> Video: ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्रीचा पतीसह लिपलॉक करतानाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणतात…
हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेला मिळालं हिंदी जाहिरातीत काम, व्हिडीओ पाहिलात का?
पुढे मानसी “मी २५ किलो वजन उचलत नाही असं म्हटल्यावर ३० किलो उचलायला हवं असं त्याने प्रोत्साहन देऊन म्हणायाला हवं. पंरतु, माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी प्रदीप असं म्हणणार नाही. त्यामुळे माझं वर्कआऊटचं होणार नाही”, असंही म्हणाली होती.