मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक आणि तिचा बॉक्सर पती प्रदीप खरेरा यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. लग्नाच्या दोन वर्षांनी त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. मानसी आणि प्रदीप यांनी प्रेम विवाह केला होता, पण काही मतभेदांमुळे त्यांनी विभक्त व्हायचं ठरवलं. प्रदीप-मानसी यांच्यात सर्व आलबेल नसल्याची चर्चा अनेक दिवस होती, पण अखेर अभिनेत्रीनेच घटस्फोटाबद्दल माहिती देत वृत्तांवर शिक्कामोर्तब केलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मानसी नाईक व प्रदीप खरेरा यांनी घटस्फोट घेणार असल्याचं जाहीर केल्यापासून ते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावरून टीका करत आहेत. पोस्ट शेअर करत ते एकमेकांवर निशाणा साधत असतात. अशातच आता मानसी नाईकची पोस्ट चर्चेत आहे. तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. “मी घेतलेला सर्वात उत्तम निर्णय…स्वतःचं रक्षण करा. मी कधीही हार मानणार नाही” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.

दरम्यान, मानसीच्या या कॅप्शनचा तिच्या घटस्फोटाशी संबंध जोडला जात आहे. तिने ‘सावरतेय’ असं कॅप्शनमध्ये दिलंय. त्यामुळे घटस्फोट हा आपण आतापर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांपैकी उत्तम निर्णय होता, असं मानसी अप्रत्यक्षपणे सांगत आहे. ‘तू खूप सुंदर आहेस आणि अनेकांसाठी प्रेरणादायी आहेस.’ ‘आयुष्य नेहमीच दुसरी संधी देतं, त्यामुळे काळजी करो नकोस, पुढे जात राहा’, ‘अखेर आम्हाला आमची मानसी नाईक पाहायला मिळाली’, अशा कमेंट्स यावर चाहत्यांनी केल्या आहेत.