अभिनेत्री मानसी नाईक हे तिच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर चांगलीच चर्चेत आली आहे. लवकरच ती तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेत वेगळी होणार आहे. दरम्यान प्रदीप आणि तिच्यामध्ये सध्या शाब्दिक युद्ध रंगलेलं दिसतंय. अशातच आता मानसी नाईकने एक पोस्ट करत सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधलं आहे.
अनेक दिवसांपासून प्रदीप आणि ती त्यांच्या पोस्टच्या माध्यमातून एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. फोटो आणि पोस्टमधून ते एकमेकांवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधत आहेत. आता अशातच मानसी नाईकने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हेही वाचा : “आता पूर्णविराम देण्याची वेळ आलीये…” म्हणणाऱ्या सुव्रत जोशीचे पत्नी सखी गोखलेने मानले आभार, म्हणाली…
नुकत्याच संपन्न झालेल्या कलादर्पण पुरस्कार सोहळ्यात तिला चित्रपट विभागातील ‘डान्स अँड स्टाईल ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला. या निमित्त आनंद व्यक्त करताना तिने तिचे काही फोटो शेअर करत लिहिलं, “हा पुरस्कार माझ्यासाठी अधिक खास आहे. अर्चना नार्वेकर आणि संपूर्ण टीमने माझ्यावर विश्वास ठेवत आणि मला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. या पुरस्काराने मला काम करण्यासाठी नवी ऊर्जा दिली आहे. अजून बरंच काही करायचंय…ही फक्त सुरुवात आहे.”
आणखी वाचा : “मी निराशा आल्यावर…” मानसी नाईकची ‘ती’ पोस्ट चर्चेत
मानसीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल आहे आहे. मानसीच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी या पोस्टवर कमेंट करत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.