Prasad Oak Wife Manjiri Oak : कधी लोकलची गर्दी, कधी वाहतूक कोंडी तर, कधी वेळेत रिक्षा-टॅक्सी न मिळणं… एकंदर मुंबईत दैनंदिन जीवनात प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. केवळ सामान्य लोकांनाच नाहीतर बहुतांश सेलिब्रिटींना सुद्धा यामुळे त्रास होतो. अनेक कलाकार वाहतूक कोंडीबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करताना दिसतात. तर, काही दिवसांआधीच रेश्मा शिंदेने फोन बघत रिक्षा चालवणाऱ्या एका चालकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता तसाच अनुभव अभिनेता प्रसाद ओकच्या पत्नीला देखील आला आहे. याबाबत मंजिरीने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंजिरी ओक रिक्षाने प्रवास करत असताना संबंधित चालक फोनवर रील्स बघत गाडी चालवत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. त्याला याबाबत दोनदा सांगूनही संबंधित चालकाने दुर्लक्ष केल्याने शेवटी तिला रिक्षा बदलावी लागली. नेमकं काय घडलं जाणून घेऊयात…

हेही वाचा : “काय ते थर्ड क्लास…”, गश्मीर महाजनीचं Bigg Boss 18 बद्दल प्रश्न विचारणाऱ्याला उत्तर; म्हणाला, “अहो तुम्ही मराठी सिनेमा…”

“पैसे देऊन आणि वर आपला जीव मुठीत घेऊन, असा प्रवास का करायचा? आणि यावर यांना काही बोलायचं नाही. कारण, काही बोललं तर यांचीच अरेरावी ऐकून घ्यायला लागेल. दोनदा सांगूनही काही सुधारणा न झाल्यामुळे मी रिक्षा बदलली… आणि तरीही त्याला काही फरक पडला नाही. म्हणजे भाडं गेलं तरी चालेल समोरच्याचा आणि स्वतःचाही जीव धोक्यात घालीन पण, मी रिक्षा चालवताना असा फोन बघणारच. पूर्ण वेळ हा असाच रिक्षा चालवतो असं अत्यंत अभिमानानी सांगितलं त्यांनी मला… एकूणच कठीण आहे सगळं, देव त्याला अक्कल देवो.” अशी पोस्ट शेअर करत मंजिरीने आपला अनुभव सांगितला आहे. याशिवाय तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीने तक्रार करण्यासाठी संपर्क देखील नमूद केला आहे.

हेही वाचा : ‘Single’ अध्याय संपला…; ‘मुलगी झाली हो’ फेम अभिनेत्याने दिली प्रेमाची जाहीर कबुली! नेटकरी म्हणाले, “ती कोण आहे?”

मंजिरी ओकची इन्स्टाग्राम स्टोरी ( Manjiri Oak )

दरम्यान, मंजिरी ओकच्या पोस्टवर मराठी कलाकारांसह नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपली मतं मांडली आहेत. “हा प्रकार वाढलाय आणि यांची अरेरावी पण”, “RTO ने अशा लोकांचे परवाने रद्द केले पाहिजेत” अशा प्रतिक्रिया मंजिरीच्या पोस्टवर युजर्सनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjiri oak angry reaction to auto driver who drove while watching phone sva 00