आदिनाथ कोठारे(Adinath Kothare) दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर ‘पाणी’ चित्रपट आधारित आहे. प्रदर्शित होण्याआधीपासूनच या चित्रपटाची मोठी चर्चा होताना दिसली होती. अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले होते. आता मंजिरी ओक(Manjiri Oak) यांनी एक खास पोस्ट लिहित आदिनाथ कोठारेचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या मंजिरी ओक?

मंजिरी ओक यांनी पाणी चित्रपटातील एक सीन सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “सगळयात आधी मला ही फिल्म बघायला उशीर झाला त्यासाठी आदिनाथ खूप सॉरी. आदिनाथ काय बोलू ? ही तुझी पहिली फिल्म कशी असू शकते ? तू खोटं बोलतोयस. अप्रतिम. फिल्म विषयी बोलयाला माझ्याकडे काहीही शब्द नाहीत. एकच सांगते ज्या क्षणी नागदरवाडीत विहिरीला पाणी लागलं, त्याक्षणी माझ्या आणि मला खात्री आहे की अनेकांच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तुझ्या घेतलेल्या कष्टांचं चीज झालं. हनुमंत केंद्रे यांच्या जिद्दीला, कष्टांना आणि त्यांच्या व सुवर्णा ताईंच्या प्रेमाला सलाम आहे. तुला खूप घट्ट मिठी आणि मनापासून धन्यवाद की या विषयाची आम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगितलीस. तुझं खूप खूप खूप कौतुक”, असे म्हणत मंजिरी ओक यांनी आदिनाथ कोठारेचे कौतुक केले आहे. याबरोबरच चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

मंजिरी ओक इन्स्टाग्राम

मंजिरी ओक यांच्या पोस्टवर आदिनाथ कोठारेने, “मंजू, थँक्यू सो मच”, असे म्हणत हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. याबरोबरच अनेक प्रेक्षकांनीदेखील मंजिरी ओक यांच्या पोस्टवर कमेंट करत चित्रपट उत्तम असल्याचे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “मंजिरी ताई बरोबर आहे.फिल्म बद्दल बोलायला शब्दच नाहीत. आमच्या नांदेड जिल्ह्यातील एका गावातील सामान्य माणसाचा संघर्ष आदिनाथ कोठारे सरांनी सर्वांसमोर मांडला. बघून खुप भारी वाटलं. चित्रपट पाहताना पुढे काय होईल ही आतुरता कायम असते. पण इतकी सुंदर चित्रपट लोकप्रिय का होत नाही, असा कधी कधी प्रश्न मनाला पडतो”, इतर अनेक चित्रपट छान असल्याचे म्हटले आहे.

मंजिरी ओक व प्रसाद ओक हे प्रेक्षकांचे लाडके जोडपे आहे. ते सोशल मीडियावर विनोदी रीलच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता मंजिरी ओक यांनी शेअर केलेली पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

हेही वाचा: राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘पुष्पा २’चा अनुभव; पोस्ट शेअर करत म्हणाले, “त्याची प्रतिमा…”

दरम्यान, ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, विकास पांडुरंग पाटील, रजित कपूर, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, किशोर कदम, श्रीपाद जोशी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. या चित्रपटाची निर्मिती धुरा प्रियांका चोप्रा, डॉ. मधू चोप्रा, नेहा बडजात्या यांनी केली आहे. नुकताच हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manjiri oak praises adinath kothare for paani movie shares special post nsp