मराठी सिनेसृष्टीतील सध्याच्या घडीचं आघाडीचं नाव म्हणजे प्रसाद ओक. प्रसादने उत्तम अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीतील स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘कुंकू लावते माहेरचं’, ‘पटलं तर घ्या’, ‘धतिंग धिंगाणा’, ‘फुल्ल थ्री धमाल’, ‘एक डाव धोबीपछाट’, ‘दुनियादारी’, ‘धुरळा’, ‘धर्मवीर’ अशा अनेक चित्रपटातून प्रसादचा उत्कृष्ट अभिनय पाहायला मिळाला. अभिनयाबरोबरच त्याने दिग्दर्शन शैलीतून प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून प्रसादचं दिग्दर्शन पाहायला मिळालं. अशा या हरहुन्नरी अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने इतर कलाकार मंडळी प्रसादला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने अनोख्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीने असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये दोघं एकमेकांकडे बघत नाहीयेत. हेच फोटो शेअर करत मंजिरीने हटके कॅप्शन लिहित वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मंजिरी ओक लिहिलं की, “का आहेत हे असे फोटोज? आणि मी आज का पोस्ट केलेत हे? प्रसाद त्याचं कारण, तुझ्या हे नेहमी लक्षात राहावं की जरी आपण एकमेकांकडे बघत नसलो तरी माझं लक्ष तुझ्यावरच आहे. बाकी ‘हॅप्पी बर्थडे’ वगैरे आहेच. ते होतंच राहील.”

मंजिरी ओकच्या या पोस्टवर प्रसाद ओकने यावर मजेशीर प्रतिक्रिया देत मंजिरीचे आभार मानले आहेत. प्रसाद लिहिलं की, ‘लक्ष’, ‘लक्ष’ आभार हां मंजू. तसंच सुकन्या मोने प्रतिक्रिया देत म्हणाल्या, “कशी आहेस गं तू? म्हणूनच मला आवडतेस.”

Comments

दरम्यान, प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘गुलकंद’, ‘सुशीला सुजीत’ हे त्याचे नवे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘सुशीला सुजीत’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि अमृता खानविलकर झळकणार आहे. या चित्रपटाच्या कथेची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रसाद ओकने सांभाळली आहे. १८ एप्रिलला ‘सुशीला सुजीत’ प्रदर्शित होणार आहे. तसंच प्रसादच्या ‘गुलकंद’ हा चित्रपट १ मेला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रसादसह सई ताम्हणकर, समीर चौघुले, जुई भागवत, वनिता खरात, ईशा डे पाहायला मिळणार आहेत.