अभिनेता पुष्कर जोगने मराठा जातीय सर्वेक्षणासाठी आलेल्या बीएमसीच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारण्यासंदर्भात पोस्ट केली होती. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांसह अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याच्यावर कारवाईची मागणीही केली जात होती. वाद वाढत असतानाच पुष्कर जोगने पोस्ट करून वापरलेल्या शब्दांबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. त्याने केलेल्या पोस्टवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुष्कर जोगची पोस्ट नेमकी काय होती?

“काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील. #जोगबोलणार,” अशी पोस्ट त्याने रविवारी केली होती.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
marathi singer vaishali samant
“मराठी कलाकारांना PF नाही, पेन्शन नाही…”, वैशाली सामंतने खंत व्यक्त करत केली ‘ही’ मागणी, म्हणाली…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Udayanraje bhosle
“झुकेगा नहीं….”, माधुरी पवार उदयनराजे भोसले यांच्याविषयी बोलताना म्हणाली, “त्यांनी माझ्यासाठी…”
Gashmeer Mahajani
“नाळ जोडली गेलेली…”, गश्मीर महाजनी महिला चाहत्यांबद्दल म्हणाला, “लहानपणापासून माझ्यावर महिलांचे…”

“…तर २ लाथा मारल्या असत्या” म्हणणाऱ्या पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी; म्हणाला, “बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल…”

pushkar jog post
पुष्कर जोगची पोस्ट

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“त्यांच्याकडे जायलाच नको होतं. त्यांना विचारायची काही गरजच नव्हती. त्यांच्याकडे संस्कार नाहीत. मागास सिद्ध करण्यासाठी कायद्याने एक समिती पाठवली, पण तिचा अवमान करणं बरोबर नाही. पण मला इतकंच म्हणायचंय की त्यांच्याकडे जायचंच कशाला? त्यांच्याकडे काय कमी आहे? ते थोडीच मागास आहेत, त्यांच्याकडे साऱ्या दुनियेचा पैसा आहे,” असं मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा?” पुष्कर जोगच्या ‘त्या’ पोस्टवर किरण मानेंचे आव्हान; म्हणाले, “नेत्यांचे पाय चाटणारी जमात…”

पुष्कर जोगने व्यक्त केली दिलगिरी

पुष्करच्या पोस्टवरून वाद निर्माण झाल्यावर त्याने सोमवारी रात्री पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली होती. “मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो,” असं पुष्करने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Story img Loader