अभिनेत्री मानसी नाईकचं खासगी आयुष्य सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने पती प्रदीप खरेरापासून विभक्त होणार असल्याचं जगजाहिर केलं. काही मुलाखतींमध्ये तिने पती प्रदीपबाबत उघडपणे भाष्य केलं. आता या दोघांमध्ये सोशल मीडिया वॉर सुरू आहे. प्रदीपने रडतानाचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर मानसीने एक पोस्ट शेअर करत त्याला अप्रत्यक्षपणे सुनावलं होतं.
मानसीच्या पोस्टनंतर प्रदीपने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओद्वारे त्याने अश्लील इशारे केले आहेत. दोघांमधील भांडण आता वेगळ्याच पातळीवर पोहोचलं असल्याचं प्रदीपच्या या व्हिडीओमधून दिसत आहे.
“मी माझं आयुष्य सुधारेन किंवा माझं आयुष्य बिघडेल ही फक्त माझी समस्या आहे. माझ्याबद्दल कोण काय विचार करतं याची मी पर्वा करत नाही.” असं प्रदीप त्याच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. मात्र हे बोलत असताना तो व्हिडीओच्या शेवटी मीडल फिंगर दाखवतो.
काय म्हणाली होती मानसी नाईक?
“आता एक नाही तर दोन-दोन पोरी भेटल्यात आणि खरं तर रडण्याच्या ओव्हर अॅक्टिंचे ५० रुपये कापायला पाहिजेत. हा एकीकडे पार्ट्या करतोय आणि रीलमध्ये रडून दाखवतोय. खोटं प्रेम… मीच फुकटची सहानुभूती देऊन टाकते. जिच्या जीवावर खाल्लं, जिचा फुकट वापर केला. कर्माची फळ मिळतातच” असं मानसीने पोस्टमध्ये म्हटलं होतं. आता प्रदीपच्या या व्हिडीओला मानसी काही उत्तर देणार का? हे पाहावं लागेल.