मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चर्चेत आहे. नुकताच तिचा ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरवरून आता अभिनेत्रीचे सगळीकडे कौतुक होत आहे. रणरागिणी म्हणजे महाराणी ताराबाई राजाराम भोसले यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे ती छत्रपती राजाराम महाराजांची भूमिका कोणी साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या टीझरच्या सुरुवातीलाच सोनाली कुलकर्णी साकारात असलेल्या ताराराणी यांचा करारी अंदाज दिसत आहे. या टीझरमध्ये छत्रपती ताराराणी औरंगजेबाच्या सैन्याविरुद्ध मराठ्यांचे नेतृत्व करताना दिसत आहेत. तसेच या टीझरमध्ये छत्रपती राजाराम महाराजांची झलक दिसत आहे. ही भूमिका कोणी साकारली असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर ही भूमिका अभिनेता आशय कुलकर्णीने साकारली आहे.

“तो काळ वाईट…” दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या चित्रपटाचा उल्लेख करत रणबीर कपूरने व्यक्त केली खंत

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून आशयकडे बघितले जाते. त्याने ‘माझा होशील ना’, ‘पहिले न मी तुला’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. आशय नुकताच ‘व्हिक्टोरिया’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

दरम्यान ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल जनार्दन जाधव यांनी केले असून प्लॅनेट मराठी, अक्षय विलास बर्दापूरकर आणि मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह व्हाईब आणि समीर अरोरा हे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून या चित्रपटाला सुप्रसिद्ध संगीतकार अवधुत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.