बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करत देशासाठी पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटूंनी आंदोलन पुकारलं आहे. २८ मे रोजी या सगळ्या कुस्तीपटूंना जंतरमंतर या ठिकाणाहून हटवण्यात आलं. त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं आणि नंतर सोडून दिलं. यादरम्यान, कुस्तीगीर आणि दिल्ली पोलिसांमध्ये झटापट झाली. यानंतर या सगळ्या कुस्तीगीरांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. हरिद्वार या ठिकाणी हे सगळे गेलेही होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केल्याने सर्व कुस्तीपटूंनी पाच दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.
त्यातच आता या संपूर्ण प्रकाराबद्दल सिनेसृष्टीतून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतंच अभिनेता आस्ताद काळेने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे.आस्ताद काळे हा नेहमी त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. तो अनेकदा विविध मुद्द्यांवर भाष्य करत त्याचे स्पष्ट मत मांडताना दिसतो. नुकतंच फेसबुकवर आस्तादने एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : “देशाची मान उंचावणारे…” कुस्तीपटू व दिल्ली पोलिसांमधील झटापटीवरुन मराठमोळ्या अभिनेत्रीचा संताप, म्हणाली…
“”मेडल्स देशाची आहेत”… मग ती जिंकणारे खेळाडू कोणाचे आहेत रे भाड**??” असे आस्ताद काळेने म्हटले आहे. आस्ताद काळेच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. संपूर्ण माहिती घ्यावी, अशी कमेंट एकाने केली आहे. त्यावर आस्तादने प्रतिक्रिया दिली आहे.
“बातम्या वाचल्या. तीन वेगवेगळ्या ठिकाणी. पण एकुणात ते खेळाडू बेवारशासारखेच वागवले जातायत हे ठाम मत आहेच”, असे आस्ताद काळेने म्हटले आहे. बातम्यांवर नको राहुस. मी तुला काही माहिती देतो, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. त्यावर आस्तादने ओके अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा : “अजून किती वर्ष हा त्रास…”, ‘शेर शिवराज’ला प्राईम टाइम न मिळाल्यानं आस्ताद काळेची संतप्त पोस्ट
नेमकं प्रकरण काय?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू आंदोलन करत आहे. नव्या संसद भवनाच्या बाहेर कुस्तीपटूंनी ‘महापंचायत’ असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू नव्या संसद भवनाकडे निघाले होते. तेव्हाच पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं. यानंतर या सगळ्या कुस्तीगीरांनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. हरिद्वार या ठिकाणी हे सगळे गेलेही होते. मात्र शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर त्यांनी सरकारला पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
काय म्हटलं आहे बृजभूषण शरण सिंह?
“माझ्यावर आरोप झालेत त्याचा एक तरी पुरावा द्या. मी कुणासोबत चुकीचं वर्तन केलं? कधी केलं ते सांगा. मी आधीही सांगितलं होतं मी आजही सांगतो आहे. माझ्याविरोधातला एक आरोप जरी सिद्ध झाला तर त्यादिवशी मी स्वतः फाशी घेईन. कुणाला काही सांगायची गरज लागणार नाही. मी माझ्या म्हणण्यावर ठाम आहे. चार महिने झाले आहेत. कुस्तीगीर महिलांचं म्हणणं आहे मला फाशी झाली पाहिजे. सरकार मला शिक्षा देत नाहीये तर आपली मेडल्स घेऊन गंगा नदीत विसर्जन करायला कुस्तीगीर गेले होते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनो मी तुम्हाला सांगू इच्छितो, गंगेत मेडल्स विसर्जित केल्याने मला फाशी दिली जाणार नाही. तुमच्याकडे कुठलाही पुरावा आहे तर तो पोलिसांना आणि न्यायालयाला द्या. न्यायालयाने मला फाशी दिली तर मी फासावर जायलाही तयार आहे. हा इमोशनल ड्रामा करु नका. ” असं उत्तर बृजभूषण सिंह यांनी दिलं आहे.