Aastad Kale on Pahalgam Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला, तर २० जण जखमी आहे आहेत. या घटनेनंतर सरकारने कठोर पावलं उचलत १९६०च्या सिंधू जल करारास स्थगिती देण्याची घोषणा केली. या संपूर्ण घटनेवर मराठी अभिनेता आस्ताद काळेने काही पोस्ट केल्या आहेत.
दहशतवाद आपल्या दाराशी अशाप्रकारे कधीही येऊन उभा राहू शकतो याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी या अशा सर्वच धर्मांधांच्या बाबतीत सजग आणि जागरुक राहायलाच हवं, असं आस्ताद काळेने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
“पहलगाममधे झालेल्या हत्याकांडाला “भ्याड हल्ला” म्हणू नका….
हा बेदरकारपणे केलेला हल्ला होता….
तो काही धर्मांधांनी व्यवस्थित रचलेल्या कटाचं फलित होता…
ते उघड उघड आपल्या मायभूमीवर पाय ठेवून, आपल्या छाताडावर नाचत, दात विचकत म्हणत आहेत,” आम्ही तुम्हाला असेच घुसून मारत राहू…काय करू शकणार आहात?? काय करू शकला आहात???!!!”
भारतीय म्हणून एकत्र येणं, सर्व प्रकारचे भेद विसरून एक देश म्हणून एकत्र येणं फार फार गरजेचं आहे.
“दहशतवादाला धर्म नसतो” हे वाक्य त्यांनी बोळा करून तुमच्या आमच्या थोबाडावर फेकलं आहे….
ते धर्मांधच होते, ते मुसलमानच होते…..
तेव्हा दहशतवाद आपल्या दाराशी अशाप्रकारे कधीही येऊन उभा राहू शकतो याची जाणीव ठेवून आपण सर्वांनी या अशा सर्वच धर्मांधांच्या बाबतीत सजग आणि जागरुक राहायलाच हवं.
तरीही या माझ्या भारत देशात आजही अनेक मुसलमान सच्चे भारतीय आहेत यावर माझा अजूनही थोडातरी विश्वास आहे.
आपल्या सैन्यात, पोलीस सेवेत, शिक्षण सेवेत, समाज सेवेत, इतरही क्षेत्रांत आहेत.
ते भारतीयच आहेत असं मी अजूनतरी मानतो.
पहलगाममधे प्राण गमावलेल्या सर्वांना वंदन.??
हे घाव झेलण्याची, पचवण्याची ताकद त्यांना मिळो हीच सदिच्छा.
जे कोणी जायबंदी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत,” अशी पोस्ट आस्तादने केली आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने १९६०च्या सिंधू जल करारास स्थगिती देण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर मत व्यक्त केलं.
“शत्रूचं पाणी तोडून जेरीस आणणं हा युद्धनीतीतला अतिशय प्राचीन असा जालीम उपाय आहे.
त्यात आता मे महिन्यातली आग बरसणार आहे,” अशी पोस्ट आस्तादने केली.

“केंद्र सरकारने पाकिस्तानविरोधात उचललेली पाउलं अतिशय स्तुत्य.
संपूर्ण पाठिंबा,” असं म्हणत आस्तादने भारत सरकारच्या निर्णयांचं कौतुक केलं आहे.