छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये अफझल खानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लवकरच भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनखं फक्त तीन वर्षांसाठीच आणली जाणार आहेत अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी दिली. आता त्यावर विविध स्तरावरुन प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. नुकतंच त्यावर अभिनेता आस्ताद काळेने पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता आस्ताद काळे हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. नुकतंच त्याने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने वाघनखांचा उल्लेख केला आहे. त्याबरोबरच त्याने एक टोलाही लगावला आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”
“”वाघनखं” आपल्याकडे आली आहेत हे चांगलंच आहे. त्यासाठी प्रयत्न केलेल्या सर्वांचं मानापासून अभिनंदन आणि आभार. पण ती आपल्याला “देऊन टाकली” नाही आहेत याची कृपया नोंद घ्यावी या ठिकाणी.
जगातील सर्व संग्रहालयं एकमेकांना स्वतःकडच्या वस्तू अशाप्रकारे काही काळापुरती देतच असतात. प्रचंड मोठी रक्कम deposit म्हणून यासाठी घेतली जाते. कागदोपत्री खूप काटेकोर आणि कायदेशीर व्यवहार त्यासाठी केला जातो. आणि एक प्रामाणिक शंका आहे. जाणकारांनी कृपया निरसन करावं. नतद्रष्ट अफझुल्याचं पोट फाडायला हीच वापरली होती, याचा ठोस काही पुरावा सादर झाला आहे का? हे मी genuinely विचारतोय. पुन्हा सांगतो, हा ऐतिहासिक ठेवा आत्ता स्वगृही असल्याचा आनंद निश्चितच आहे”, असे आस्ताद काळेने म्हटले आहे.
आस्ताद काळेच्या या पोस्टवर अनेक कमेंट पाहायला मिळत आहेत. यातील अनेकांनी “पुरावा भेटणे खूपच कठीण आहे’, असे म्हटले आहे. “तेच तर दुःख आहे. तो जर मिळाला, तर काय बहार येईल!!!!!” असे उत्तर आस्ताद काळेने म्हटले आहे.
आणखी वाचा : “…तर त्यांनी मला नक्कीच बसवलं असतं”, अशोक सराफ यांना सुनावणाऱ्यांवर भडकले भाऊ कदम, म्हणाले “कृपया…”
दरम्यान हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी वाघनख नावाच्या शस्त्राने आदिलशाहाचा सरदार अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याचा वध केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे शस्त्र सध्या इंग्लंडमधील वास्तूसंग्रहालयात आहे. ही वाघनखं महाराष्ट्रात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत.