विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ गडी राखून पराभव केल्याने भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण पसरलं आहे. हा अंतिम सामना पाहण्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दीपिका पदुकोण, रणवीर सिंह, शाहरुख खान, गौरी खान, आशा भोसले, सुहाना खान, अथिया शेट्टी, अनुष्का शर्मा असे अनेक सेलिब्रिटी गेले होते. याशिवाय भारताचे अनेक माजी खेळाडू देखील हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते. परंतु, या अंतिम सामन्यासाठी कपिल देव यांना आमंत्रित केलं नव्हतं. यावरून आता एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काकस्पर्श’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेल्या अभिजीत केळकरने कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याने एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. “आयसीसी, क्रिकेट वर्ल्डकप, बीसीसीआयचा त्रिवार निषेध! हे अत्यंत चुकीचं असून याबद्दल लाज वाटली पाहिजे…लव्ह यू कपिल देव सर” असं अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अभिजीतने शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांकडून सुद्धा प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा : एकेकाळी क्रिकेट टीमचा कॅप्टन, भाऊ हिरो झाल्याने इंडस्ट्रीत आला ‘हा’ अभिनेता, २२०० कोटी कमावणाऱ्या सिनेमातून पदार्पण पण…

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण मिळालं नसल्याचं सांगितलं होतं. “मला माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर (१९८३ ची टीम) हा अनुभव घ्यायचा होता पण, सोहळ्यासाठी आम्हाला आमंत्रण दिलं नाही. त्यांनी मला बोलावलं नाही म्हणून मी गेलो नाही. अनेक जबाबदाऱ्या सांभाळताना काही गोष्टी लोक विसरून जातात” असं मत त्यांनी मांडलं होतं.

अभिजीत केळकर

हेही वाचा : ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील ‘या’ अभिनेत्याची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत एन्ट्री; झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत

दरम्यान, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये आपला पहिला विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वात भारताने दुसरा विश्वचषक जिंकला होता. यंदाही भारतीय संघाकडून क्रिकेटप्रेमींना प्रचंड अपेक्षा होत्या परंतु, सलग १० सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पराभव केला आणि सहाव्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor abhijeet kelkar angry on bcci and icc for not inviting kapil dev for world cup final match sva 00
Show comments