महाराष्ट्रातील  नागपूर-मुंबई ‘द्रुतगती समृद्धी महामार्गा’ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. या बहुप्रतीक्षित महामार्गाच्या  नागपूर ते शिर्डी या पहिल्या ५२० किमी टप्प्याचे लोकार्पण ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर १० तासांऐवजी ५ तासांत कापता येणार आहे. याबाबत मराठी कलाविश्वातील अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनावरुन अभिनेता अभिजीत केळकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे. अभिजीतने या पोस्टमधून त्याच्या संताप व्यक्त केल्याचं दिसत आहे. “आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…गेली १२ वर्षे” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. इमोजीमधून अभिनेत्याने त्याचा संताप व्यक्त केला आहे. त्याच्या या पोस्टवर चाहतेही व्यक्त होताना दिसत आहेत.

हेही वाचा>> “तो मर्द आहे…” अर्जुन कपूरवरुन ट्रोल करणाऱ्यांना मलायका अरोराने सुनावलं

हेही वाचा>>Video: क्लासिक इंटेरिअर, प्रशस्त हॉल अन् खिडकीतून दिसणारी मुंबई; सिद्धार्थ-मितालीने असं सजवलं त्यांच्या स्वप्नातलं घर

अभिजीत सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावरुन तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. अभिजीत नेहमीच सामाजिक गोष्टींबाबत त्याचं मत अतिशय परखडपणे मांडताना दिसतो. कुटुंबियांबरोबरचे फोटो अनेकदा तो त्याच्या अकाऊंटवरुन शेअर करत असतो.

हेही वाचा>> सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणीच्या लग्नाबाबत मित्राचा खुलासा, म्हणाला “त्यांच्या लग्नाची पत्रिका…”

अभिजीतने नाटक, मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बिग बॉसच्या मराठीच्या दुसऱ्या पर्वातही तो सहभागी झाला होता.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor abhijeet kelkar post on samruddhi mahamarg seeking attention on internet kak