दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ‘ती सध्या काय करते’ हा अभिनयचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट फार सुपरहिट ठरला. सध्या तो ‘बॉईज ४’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच अभिनयने एका नेटकऱ्याला सडेतोड उत्तर दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बॉईज ४ या चित्रपटात अभिनय बेर्डेची एंट्री ही बाईकवरुन होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे अनेकजण त्याला “खऱ्या आयुष्यात तू बाईक चालवायला केव्हा शिकलास?” असा प्रश्न विचारताना दिसत आहेत. यावेळी अभिनय म्हणाला, “मला जेवढी बाईक चालवता येते ती फक्त सिनेमापुरती येते. प्रत्यक्षात माझ्या आईने मला कधीच गाडी चालवू दिली नाही.”
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

त्याने दिलेल्या या मुलाखतीच्या बातम्यांवर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत. त्यातील एका कमेंटला त्याने सडेतोड उत्तर दिले आहे. “वैयक्तिक आयुष्यबाबत कोणी विचारले का? खुलासा केला त्याबाबत कोणी विचारले का? एवढा वेळ नाही लोकांना”,अशी कमेंट एकाने केली आहे.

त्यावर अभिनय बेर्डेने सडेतोड उत्तर दिले. “तुम्हाला तुमचं मत विचारलं तरी इथे येऊन आगाऊपणा करता ना? तसं मला जे बोलायचं ते बोलेन. तुम्ही करत बसा फालतू बडबड. आपल्या दोघांना तेवढं स्वातंत्र्य आहे”, अशी प्रतिक्रिया अभिनय बेर्डेने त्या नेटकऱ्याच्या कमेंटवर दिली आहे.

अभिनय बेर्डे कमेंट

आणखी वाचा : “चाइल्ड अस्थमा, अ‍ॅलर्जीचे अटॅक अन्…”, निवेदिता सराफ यांनी सांगितली मुलाच्या बालपणीची अवस्था; म्हणाल्या “त्याला सोडून…”

दरम्यान अभिनय बेर्डेच्या कामाबद्दल बोलायचं तर लवकरच तो प्रथमेश परबबरोबर ‘सिंगल’ या चित्रपटात झळकणार आहे. त्याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’ या चित्रपटात झळकला. आता लवकरच तो ‘बॉईज ४’ या चित्रपटात झळकत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor abhinay berde comment on netizen ask for personal life nrp