दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकेकाळी फक्त चित्रपटसृष्टीच नाही तर रंगभूमीही गाजवली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अभिनय बेर्डेने काही वर्षांपूर्वीच अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. त्याचा ‘ती सध्या काय करते’ चित्रपट बराच गाजला. आता सध्या अभिनय हा बॉईज ४ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच अभिनयने त्याची त्याच्या वडिलांबरोबर होणाऱ्या तुलनेबद्दल भाष्य केले.

अभिनय बेर्डेने कलाकृती मीडिया या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा असल्याने तुझी तुलना केली जाईल, जर कधी काम आवडलं तर काय, याचं कधी दडपण वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने स्पष्टीकरण दिले.
आणखी वाचा : बेबी कॉर्न, ब्रोकोली अन्…; मराठमोळ्या शशांक केतकरने बनवला पास्ता, म्हणाला “जेवण बनवल्याने…”

trinidha rao nakkina apologize anshu ambani
आधी अभिनेत्रीच्या शरीराबद्दल केलं आक्षेपार्ह विधान, नंतर दिग्दर्शकाने मागितली माफी; अंशू अंबानी प्रतिक्रिया देत म्हणाली…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
aamir khan kiran rao
“त्याची आई अजूनही…”, किरण रावचं आमिर खानच्या कुटुंबाबद्दल भाष्य; त्याच्या मुलांची नावं घेत म्हणाली…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण

“माझ्यासोबत या गोष्टी नेहमी घडत असतात. त्या नेहमी घडत राहणार याची मला खात्री आहे. मी त्या गोष्टी स्वीकारल्या आहेत. माझ्या हातात ती गोष्ट नाही. माझ्या हातात फक्त प्रामाणिकपणे काम करत राहणे इतकंच आहे. त्यामुळे मी तेच करतो. मी माझं काम जितकं होईल, तितकं प्रामाणिकपणे करण्याचा पुरेपुर प्रयत्न करतो”, असे अभिनय बेर्डेने म्हटले.

“जर ते लोकांना आवडलं, तर चांगलं आहे. पण लोकांना आवडलं नाही तर मी त्यांची माफी मागतो आणि तुम्हाला अजून चांगलं देण्यासाठी प्रयत्न करेन. त्यांना मी सध्या इतकंच सांगू शकतो. लोकांना माझ्याकडून जे बघायचं, त्याच्यापेक्षा मला त्यांना काय द्यायचं आहे, त्यावर माझं लक्ष जास्त असतं. लोकांना माझ्याकडून सर्वच गोष्टी हव्या असतात, पण त्या सर्वच गोष्टी जर मी केल्या तर मी चांगला दिसणार नाही. पण मी तुम्हाला काय चांगलं देऊ शकतो, याचा मी प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला ते आवडलं तर चांगलंच आहे आणि नाही आवडलं तर मी अजून चांगलं करेन”, असेही तो म्हणाला.

आणखी वाचा : शशांक केतकरच्या पत्नीने शेअर केला शाहरुख खानसोबतचा ‘तो’ फोटो, नेटकरी म्हणाले “तुझा नवरा…”

दरम्यान अभिनय बेर्डेच्या कामाबद्दल बोलायचं तर त्याने ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर तो ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘बांबू’ या चित्रपटात झळकला. आता लवकरच तो ‘बॉईज ४’ या चित्रपटात झळकणार आहे. तसेच तो प्रथमेश परबबरोबर ‘सिंगल’ या चित्रपटातही झळकणार आहे.

Story img Loader