गेल्या दोन दिवसांपासून अनेक मराठी चित्रपटांना स्क्रीन न मिळण्याचा मुद्दा चर्चेत आहे. हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेल्या ‘सनी’ या मराठी चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र अनेक चित्रपटगृहात मराठी चित्रपटाला दुय्यम स्थान दिलं जात असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. प्रेक्षकांचा चित्रपटाला बऱ्यापैकी प्रतिसाद असतानाही अभिनेता अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ या चित्रपटासाठी अनेक शो रद्द केले जात असल्याचे दावा कलाकार करत आहे. याप्रकरणी अभिनेता अभिषेक देशमुख याने संताप व्यक्त केला आहे.

अभिषेक देशमुख हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ‘लोकसत्ता’ वेबसाईटने केलेल्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देताना त्याने “तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन शो कॅन्सल करण्यात आला..” असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “तिकीटं काढल्यानंतर पैसे परत देऊन…” मराठी चित्रपटाचा शो रद्द केल्यानंतर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट

Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा?”, सुरेश धस यांचं विधान, रोख कुणाकडे? परळी पॅटर्नचा उल्लेख करत म्हणाले…
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
When Jaya Bachchan said she felt like slapping Shah Rukh Khan (1)
“मी त्याला झापड मारली असती”, सून ऐश्वर्या रायमुळे शाहरुख खानवर भडकलेल्या जया बच्चन
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Ajit Pawar dhananjay munde walmik karad
“बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
marathi actress abhidnya bhave shares screen with abhishek bachchan
अभिषेक बच्चनसह जाहिरातीत झळकली ‘ही’ मराठी अभिनेत्री! ‘रंग माझा वेगळा’मध्ये साकारलेली खलनायिकेची भूमिका, ओळखलंत का?
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार

अभिषेकच्या या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी पोस्ट करत यावर संताप व्यक्त केला आहे. “गेल्या ३ दिवसांपासून दक्षिण मुंबईत एकही शो नाही. फारच वाईट”, अशी कमेंट एका प्रेक्षकाने केली आहे. त्यावर अभिषेकने रागातला इमोजी शेअर केला आहे.

तर एका महिलेने तिलाही चित्रपटाचे शो मिळत नसल्याबद्दल कमेंट करत सांगितले आहे. “मी देखील दक्षिण मुंबईत हा चित्रपट कोणत्या चित्रपटगृहात लागला आहे, ते पाहत होते. आम्ही गेल्या रविवारी हा चित्रपट पाहण्याची योजना आखत होतो. ना प्लाझा, ना मुक्ता किंवा ना नक्षत्र यासारख्या कोणत्याच चित्रपटगृहात याचा शो नाही. खूप वाईट वाटलं…”, अशी कमेंट त्याने केली आहे. त्यावर ‘खरंय! असहय्य!’ अशी प्रतिक्रिया अभिषेक देशमुखने दिली आहे. तर एकाने ‘हे खूपच वाईट आहे’, असे म्हटले आहे. त्यावर अभिषेकने ‘हे फारच वाईट आहे’, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : अजय देवगणच्या ‘दृश्यम २’मुळे मराठी चित्रपटाचे शो रद्द? दिग्दर्शक हेमंत ढोमे संतापला, सरकारला विनंती करत म्हणाला…

दरम्यान हेमंत ढोमेने दिग्दर्शित केलेला ‘सनी’ हा मराठी चित्रपट सध्या बराच गाजतोय. घरापासून दूर असलेल्या एका तरुणाची कथा असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण असं असताना ही काही प्रेक्षकांना मात्र तिकिटाचे पैसे परत करून चित्रपटगृहाच्या व्यवस्थापणाने चित्रपटाचा शो कॅन्सल करण्यात आल्याचं सांगितलं. यासंबंधी ट्वीट करून हेमंत ढोमेने मराठी चित्रपटांना दिल्या जाणाऱ्या दुय्यम वागणूकीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘ सनी ‘ चित्रपटात अभिनेता ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहे. त्याच बरोबर चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट १८ नोव्हेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.

Story img Loader