मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. आदिनाथ त्याच्या चित्रपटांबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असतो. तसेच तो त्याची सहा वर्षांची लाडकी लेक जीजा हिच्याबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्राम व फेसबूकवर शेअर करत असतो. आता आदिनाथने केलेली एक पोस्ट चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आदिनाथ व जीजा या बाप-लेकीचे व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडतात. दोघेही अनेकदा मस्ती करताना दिसतात. आता आदिनाथने त्याच्या लाडक्या लेकीला पडलेला एक प्रश्न आणि त्यावर त्याने दिलेलं उत्तर यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे. हल्ली माझ्या मुलीच्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरंच नसतात, असं आदिनाथने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सिनेमा फ्लॉप झाल्याने बुडाले पैसे, बॉलीवूड अभिनेता कोट्यवधींचं कर्ज फेडण्यासाठी सर्कसमध्ये….

आदिनाथची पोस्ट नेमकी काय?

“बरेच लोक मला विचारत असतात, “अरे तू ते #जीजाआणिडॅडा का लिहीत नाहीस हल्ली?” तर त्याचं उत्तर असं आहे की हल्ली माझ्या मुलीच्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरंच नसतात. असो. मला वाटतं तेही तुम्हाला आवडेल वाचायला. तर मग असा एक प्रयत्न करून बघूया. काय वाटतं? #जीजाआणिडॅडा season2,” असं कॅप्शन देत आदिनाथने लेकीबरोबरचा एक संवाद सांगितला आहे.
जीजा : डॅडा, बॉयफ्रेंड आणि फ्रेंडमध्ये काय फरक असतो?
डॅडा:….
जीजा: डॅडा सांग ना
डॅडा:….
जीजा: डॅडा?
डॅडा: अगं काही नाही. दोन्ही सेम असतात.
असं आदिनाथने एक फोटो पोस्ट करून द्यावर लिहिलं आहे. हा फोटो आदिनाथ व जीजा यांचा सेल्फी आहे.

आदिनाथने केलेल्या या पोस्टवर नेटकरी विविध कमेंट्स करत आहेत. ‘आजकालची मुलं काय विचारतील ना त्याचा नेम नाही’, ‘प्रश्न वाढतच जाणार आहेत, तयारी ठेवा उत्तरांची,’ ‘आजची मुलं खूप हुशार आहेत, आम्हाला पण कधी कधी काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडतो,’ अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर अनेकांनी हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. काही नेटकऱ्यांनी जीजा व डॅडाच्या या सीझन २ ची वाट पाहत असल्याचं म्हटलं आहे.

“आम्ही दारू प्यायलो अन्…”, घटस्फोटानंतर पतीसह केलेल्या पार्टीबद्दल सई ताम्हणकरचे विधान; नात्यातील फसवणुकीबद्दल म्हणाली…

दरम्यान, आदिनाथ कोठारेच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास नुकताच तो ‘शक्तिमान’ चित्रपटात झळकला होता. यात स्पृहा जोशीची महत्त्वाची भूमिका होती. आदिनाथ लवकरच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय चित्रपटात समीर धर्माधिकारी, मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, मनोज जोशी, स्मिता शेवाळे, सचिन देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, अश्विनी महांगडे या कलाकारांची मांदियाळी आहे. चित्रपट २ ऑगस्टला प्रदर्शित होईल.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor adinath kothare daughter jizah kothare asked him difference between friend and boyfriend hrc