मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेले नावं म्हणून अभिनेता आदिनाथ कोठारेला ओळखले जाते. आदिनाथने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आदिनाथ कोठारेची प्रमुख भूमिका असलेला ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरला. नुकतंच त्याने अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलची खास आठवण सांगितली आहे.
आदिनाथ कोठारेला घरातूनच कला क्षेत्राचा वारसा लाभला आहे. बालकलाकार म्हणून त्याने अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. लहानपणी वडिलांबरोबर शूटिंगच्या सेटवरही जायचा. यावेळी घडलेल्या अनेक गंमतीजमतींबद्दल आदिनाथ कोठारेने एका मुलाखतीदरम्यान सांगितले.
आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”
आदिनाथ कोठारे काय म्हणाला?
“माझ्या बालपणी मी चित्रपटसृष्टीला खूप जवळून बघितलं आहे. मी सेटवर बागडायचो. मी ट्रॉलीबरोबर खेळायचो. दर मे महिन्यात माझ्या वडिलांच्या चित्रपटाचे शूटींग कोल्हापूरमध्ये असायचं. मी तिथे बाईक चालवायला शिकलो. मी तिथे उनाडक्या करायचो. क्रेनवर बसायचो.
मला सर्वात आवडता टाईमपास लक्ष्मीकांत बेर्डेंनी शिकवला. लक्ष्या काकांनी याची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांचा तो वारसा मला चालवायला दिला. त्यांनी शिकवलेला टाईमपास म्हणजे मेकअप मॅनचा स्प्रे घ्यायचा. त्यावेळी मोठे स्प्रे असायचे, त्याला पुढे नॉब असायचं. तो नॉब थोडा उघडला की तो लांब जायचा आणि त्यानंतर गुपचूप लोकांवर स्प्रे मारायचा.
लक्ष्या काका म्हणजे तेव्हा हे करण्यात फार हुशार होते. त्यांनी मला शिकवलेला तो टाईमपास मला आवडला होता. मी ते सतत करायचो. त्यामुळे मी जेव्हा सेटवर यायचो तेव्हा सर्व मेकअप मॅन त्यांचा स्प्रे लपवायचे”, असे आदिनाथ कोठारे सांगितले.
आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी
दरम्यान आदिनाथ कोठारेने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्माता अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले आहे. फक्त मराठी मालिका आणि चित्रपट नव्हे तर बॉलिवूड चित्रपटातही तो झळकला. कबीर खान दिग्दर्शित ८३ या चित्रपटात तो झळकला. या चित्रपटामधून क्रिकेटर दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत आदिनाथने आपला अभिनयाचा ठसा उमटवला.