मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे हा सतत चर्चेत असतो. एका फिल्मी परिवारातून आलेला असला तरी आदिनाथने या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले आहेत. आजचे स्टारकिड्स ज्या पद्धतीने वागतात तशी जडणघडण आणि संस्कार आदिनाथवर कधीच झाले नाही. नुकतंच एका मुलाखतीमध्ये आदिनाथ कोठारेने या सगळ्याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आदिनाथ कोठारेने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सगळं बदललं’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. यावेळी त्याने सिनेसृष्टी, वडील किंवा आजोबांबरोबर असलेले नाते, तसेच कठीण काळात त्यांच्या कुटुंबावर ओढवलेल्या समस्या आणि त्यातून ते बाहेर कसे पडले अशा वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केलं आहे. आपल्या वडिलांनी आणि कुटुंबाने घेतलेली मेहनत आणि कष्ट यातून आदिनाथला बरंच शिकायला मिळालं. शिवाय अशाच काही घटनांमधून त्याला पैशाचीसुद्धा किंमत कळली हे त्याने या पॉडकास्टमध्ये सांगितलं.

आणखी वाचा : अक्षय कुमारचा बॉक्स ऑफिसवरचा सलग पाचवा फ्लॉप चित्रपट ‘सेल्फी’ आता ओटीटीवर; वाचा कुठे बघायला मिळणार?

इतकंच नव्हे तर एकेकाळी कर्ज न फेडल्याने त्यांच्या मुंबईतील घरच्या जप्तीबद्दलही आदिनाथने खुलासा केला आहे. तो म्हणाला, “२००५ साली ‘खबरदार’ या चित्रपटाचं शूटिंग माझे वडील कोल्हापुरात करत होते, मी त्यावेळी त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रथमच काम करत होतो. त्यावेळी आमच्या डोक्यावर भरपूर कर्ज होतं, वडिलांनी २००० साली एक हिंदी चित्रपट केला होता जो चालला नव्हता त्यामुळे ते कर्ज फेडता येत नव्हतं. २००५ मध्ये जेव्हा आम्ही खबरदारचं चित्रीकरण करत होतो तेव्हा बँकेने आमचं मुंबईतील घर जप्त केलं होतं.”

पुढे आदिनाथ म्हणाला, “एवढ्या खडतर काळातही माझ्या वडिलांनी त्या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं. या गोष्टींची झळ त्यांनी मला बसू दिली नाही. चित्रीकरण झाल्यानंतर त्यांनी मला आणि माझ्या आजी आजोबांना पुण्याच्या घरी पाठवलं आणि मुंबईत येऊन ते दुसरं घर शोधत होते. त्यामुळे असा काळही मी पाहिला आहे.” आदिनाथ कोठारे आणि उर्मिला यांनी २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. उर्मिला आणि आदिनाथ या दोघांना १८ जानेवारी २०१८ ला कन्यारत्न प्राप्त झाले.आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. त्यांच्या मुलीचे नाव जिजा असं आहे.