‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर सुभेदार हा चित्रपट प्रदर्शित झाला.हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटात नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका अभिनेते अजय पुरकर यांनी साकारली आहे. नुकतंच अजय पुरकर यांनी ‘सुभेदार’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अभिनेते अजय पुरकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत. याला कॅप्शन देताना त्यांनी ‘सुभेदार’ चित्रपटादरम्यान झालेल्या दुखापतीबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “मला तिच्याबरोबर…”, अपूर्वा नेमळेकरने सांगितला तेजश्री प्रधानबरोबर काम करण्याचा अनुभव, म्हणाली “आम्ही एकत्र…”

अजय पुरकर यांची पोस्ट

“जय शिवराय …..श्री शिवराज अष्टक अर्ध्यावर येऊन आता पाचवा चित्रपट देखील मराठी माणसांनी साजरा केला आहे……सुभेदार सर्वत्र हाऊसफुल्ल सुरू आहे. सर्व शिवभक्त आणि रसिकांचे खूप खूप आभार….

हे शिवधनुष्य पेलताना अनेक लोकांचा हातभार लागतो. सुभेदारच्या चित्रीकरणादरम्यान माझ्या पायाला बऱ्यापैकी गंभीर दुखापत झाली होती. पण अश्या वेळेस माझ्यासाठी कायम आधार असतो तो म्हणजे डॉ. चेतन प्रधान आणि त्यांची पत्नी फिजिओथेरेपिस्ट डॉ. श्रद्धा प्रधान ह्यांचा.

ह्या वेळेस अजून एक मित्र मिळाले. अद्भूत कौशल्य असलेले प्लास्टिक सर्जन डॉ. कौस्तुभ ह्यांच्या अथक परिश्रमानंतर एक महिन्यात माझा पाय पूर्ण बरा झाला आणि चित्रीकरण पूर्ण करू शकलो…..

डॉ. चेतन आणि श्रद्धा प्रधान आणि डॉ. कौस्तुभ शेंडे तुमचे खूप खूप आभार. सुभेदार चित्रपटाच्या यशामध्ये तुमचं मोलाचं योगदान आहे”, अशी पोस्ट अजय पुरकर यांनी केली आहे.

आणखी वाचा : रिंकू राजगुरुच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट झाल्या गायब, कारण अद्याप अस्पष्ट

दरम्यान ‘सुभेदार’ हा चित्रपट ‘श्री शिवराज अष्टका’मधील हे पाचवं चित्र पुष्प आहे. यात सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.