नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील गाणी, ट्रेलर सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरे ही भूमिका अभिनेते अजय पुरकर साकारत आहेत. नुकतंच त्यांनी या चित्रपटातील भूमिकेबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर हे तानाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा साकारत आहे. या चित्रपटातील एक सीन शूट करताना अजय पुरकर यांना गंभीर दुखापत झाल्याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीदरम्यान केला.
आणखी वाचा : “सुभेदारांच्या समाधीसमोर बसलो अन्…” अजय पूरकर यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

“‘श्री शिवराज अष्टक’तील चार चित्रपट आम्ही शूट केले. सुदैवाने कधीही दुखापत झाली नाही. पण ‘सुभेदार’ च्या वेळी तो क्षणही आला. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये माझ्या अंगाला लागून मशाल पडते आणि त्या मशालीवरून मला उडी मारून जायचं होतं, असा एक सीन होता. पण त्यावेळी नेमकी त्या मशालीमध्ये माझी कोल्हापुरी अडकली. त्यानंतर त्या मशालीच्या टोकाने माझ्या पायाच्या अंगठ्याच्या इथे गंभीर दुखापत झाली. मी तेव्हा दुर्लक्ष केले आणि दोन दिवस तसंच चित्रीकरण केलं.”

“पण नंतर ते दुखणं वाढत गेलं. त्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो. सहा टाके पडले. तेव्हा दिग्पाल आणि निर्मात्यांनी निर्णय घेतला की आपण थांबूया. कारण जखम तशी गंभीर आहे. आपल्याला या चित्रपटाचं शूटींग करायचं असेल तर त्याला आधी बरं वाटू द्या. तेव्हा ते सगळे माझ्या पाठीशी उभे राहिले. मी एका महिन्यात ती जखम रिकव्हर केली. त्यानंतर पुन्हा आम्ही आणखी जोमाने शूट केलं. जो तुम्हाला आता ट्रेलरमध्ये दिसतोय”, असे अजय पुरकर यांनी सांगितले.

आणखी वाचा : “…बस इतकेच”, सुश्मिता सेनची ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर सुबोध भावेची पोस्ट, म्हणाला “रवी जाधव तुझ्या…”

दरम्यान येत्या २५ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.