‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’ या चार ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर ‘सुभेदार’ हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. यानिमित्ताने अभिनेते अजय पुरकर यांनी या चित्रपटातील भूमिकेबद्दल भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या कामगिरीवर आधारित ‘सुभेदार’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘सुभेदार’ या चित्रपटात अभिनेते अजय पुरकर हे तानाजी मालुसरे यांची व्यक्तीरेखा साकारणार आहेत. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सुभेदारांनाच विचारुन चित्रपटात भूमिका साकारली, असा खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “…दिग्पाल काका चुकला”, ‘पावनखिंड’ पाहिल्यानंतर चिन्मय मांडलेकराच्या लेकाने दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेला “बाजीप्रभू…”

“मी लहानपणापासून सिंहगडावर येतोय. पण मी पहिल्यांदा सिंहगडावर कधी आलो होतो, हे मला आठवत नाही. मी खूप वेळा सिंहगडावर आलो आहे. मी शूटींगच्या आधी कायम इथे येतो. ‘फत्तेशिकस्त’च्या वेळी मी इथे आलो होतो”, असे अजय पुरकर म्हणाले.

“‘सुभेदार’च्या वेळीही इथे आवर्जुन आलो. मी अर्धा तास सुभेदारांच्या समाधीजवळ डोळे मिटून बसलो होतो. त्यावेळी मी त्यांना तुमचं पूर्ण चरित्र मांडतोय हे सांगितलं. त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि त्यांना विचारलं की तुम्हीच सांगा काय, कसं करायचं आहे. त्यामुळे मी सुभेदारांनाच विचारुन ही भूमिका साकारली आहे”, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

आणखी वाचा : Video : “फक्त ५०० मावळे अन् कोंढाणा…”; अंगावर शहारे आणणारा ‘सुभेदार’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

दरम्यान येत्या १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय पूरकर सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर त्यांच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor ajay purkar share sinhagad fort memory subhedar movie tanaji malusare role nrp
Show comments