मराठी सिनेसृष्टीतील एकेकाळचे देखणे अभिनेते म्हणजे अजिंक्य देव. अजिंक्य देव यांनी आपल्या दमदार अभिनयाने व जबरदस्त पर्सनालिटीने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मराठीचं नव्हे तर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. लवकरच अभिनेते अजिंक्य देव रणबीर कपूरच्या बहुचर्चित, बहुप्रतीक्षित अशा एका चित्रपटामध्ये झळकणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणबीर कपूरचा आगामी चित्रपट ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव पाहायला मिळणार आहेत. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटात प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आणि हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहे. या चित्रपटात अजिंक्य देव महत्त्वपूर्ण भूमिकेत असणार आहेत.

हेही वाचा – ऑफिसमधून थकून आलेल्या सूनबाईसाठी प्रथमेश परबच्या आईने केला ‘हा’ खास पदार्थ, क्षितिजा फोटो शेअर करत म्हणाली…

‘महाराष्ट्र टाइम्स’शी बातचित करताना अजिंक्य देव म्हणाले, “मी या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचा भाग आहे. एक खूप चांगली भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. सध्या आमची कार्यशाळा सुरू आहे. चित्रपटात प्रभू श्रीराम यांची व्यक्तिरेखा रणबीर कपूर साकारतोय. लवकरच त्याचं चित्रीकरण सुरू होईल आणि तेव्हा मी त्याबाबत नक्की सांगेन. सध्या यासंबंधित आवश्यक वाचन व अभ्यास सुरू आहे. त्याविषयीच्या सर्वच गोष्टींची सुरुवात आहे. त्यामुळे मी आता याबाबत फार बोलू शकणार नाही.”

हेही वाचा – Video: …यामुळे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर भडकला, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “देऊ का एक थोबाडीत?”

‘रामायण’ चित्रपटात विश्वामित्र ही भूमिका साकारत आहात का? असं विचारल्यावर अजिंक्य देव म्हणाले, “आता यावर सविस्तर बोलणं थोडं अवघड आहे. काही गोष्टी गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे मी माझ्या व्यक्तिरेखेबाबत फार सांगू शकत नाही.”

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor ajinkya deo play role in ranbir kapoor ramayan movie pps