अजिंक्य देव मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. अंजिक्य देव यांना त्यांचे वडील दिवंगत अभिनेते रमेश देव आणि आई दिवंगत अभिनेत्री सीमा देव यांच्याकडून अभिनयाचा वारसा मिळाला. अजिंक्य देव यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. पण ‘माहेरची साडी’ चित्रपटातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अजिंक्य देव यांनी या चित्रपटादरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

हेही वाचा- “माझ्या जन्मावेळी आई मरतामरता वाचली होती”; जितेंद्र जोशीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला “डॉक्टर म्हणालेले…”

Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Shahid Kapoor
“जवळच्या गोष्टींचा त्याग…”, ‘देवा’ चित्रपटासाठी शाहिद कपूरने केली ‘ही’ गोष्ट; म्हणाला, “एक कलाकार म्हणून…”
chhaava movie lezim scene controversy marathi actress ruchira jadhav
“चित्रपट बघण्याआधीच निर्बुद्धपणे…”, ‘छावा’च्या वादावर मराठी अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, “माझ्या राजाला…”
Fatima Sana Shaikh News
Fatima Sana Shaikh : फातिमा सना शेखने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव; “तो माणूस मला म्हणाला, तुला…”
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
shahid kapoor on where would be geet aditya jab we met (1)
“घटस्फोट झाला असता”, करीना कपूर संदर्भातील ‘त्या’ व्यक्तीच्या वक्तव्यावर शाहिद कपूर म्हणाला, “तिला कोण सहन करेल…”
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

नुकतचं अजिंक्य देव यांनी लोकमत फिल्मी या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या करिअरबरोबर वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांचा उलगडा केला. अजिंक्य देव यांची प्रमुख भूमिका असलेला ‘माहेरची साडी’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात त्यांनी अलका कुबल यांच्या भावाची भूमिका साकारली होती. अजिंक्य देव यांच्या या भूमिकेचं विशेष कौतुकही झालं होतं. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा हा फ्लॉप ठरणार असंच त्यांना वाटलं होतं.

हेही वाचा- “बाळासाहेब ठाकरेंचे आमच्यावर उपकार आहेत,” अजिंक्य देव यांचे वक्तव्य; आठवण सांगत म्हणाले, “मी एकदा मातोश्रीवर…”

अजिंक्य देव म्हणाले. “माहेरची साडी’ चित्रपटाची बॉम्बे लॅबमध्ये ट्रायल झाली होती. या ट्रायलला मी आणि माझी बायको गेलो होतो. मला आणखी एका ठिकाणी शूटिंगला जायचं होतं. म्हणून चित्रपट पाहिल्यानंतर मी थोडं लवकर निघालो. बाहेर पडताना मी माझ्या बायकोला माझ्या नावावर अजून एक फ्लॉप पडणार असं म्हणालो होतो. त्यानंतर चित्रपटाच्या प्रिमियरला मी जाऊ शकलो नव्हतो. त्यावेळी मी उटीला शूट करत होतो. पण तिथे मला एकाने फोन करुन सांगितलं की चित्रपट सुपरहिट झाला आहे.”

अजिंक्य देव पुढे म्हणाले ” मी ऐकलं आहे की, आजही ‘माहरेची साडी’ चित्रपट बघितल्यानंतर बायका रडतात. या चित्रपटाचे दोन आठवडे राऊंड क्लॉक म्हणजे १२-३-६-९ असे शो लागले होते.हा चित्रपट बघण्यासाठी ट्रकभरुन बायका यायच्या. या चित्रपटाने विजय कोंडकेंना खोऱ्याने पैसे दिले. पहिल्या दिवसापासूनच त्यांना याची कल्पना होती. पण ‘माहेरची साडी’ चित्रपट चालेल असं मला कधीच वाटलं नव्हतं,”

Story img Loader