दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता म्हणून आकाश ठोसरला ओळखले जाते. ‘सैराट’ चित्रपटातील ‘परश्या’ या भूमिकेमुळे त्याला खरी ओळख मिळाली. आकाश ठोसर हा सध्या उत्तराखंडामध्ये ट्रेकींगचा थरार अनुभवताना दिसत आहे. नुकतंच त्याने याचे काही फोटो पोस्ट केले आहेत.

आकाश हा सोशल मीडियावर सतत सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत आकाश हा उत्तराखंडातील एका नदीजवळ उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या पाठीमागे निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : कानटोपी, स्वेटर अन्…; आकाश ठोसरची केदारनाथ सफर, फोटोने वेधलं लक्ष

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
water channel in street near Balaji Temple in Ajde Pada area of ​​MIDC in Dombivli burst for few months
डोंबिवलीत आजदे पाड्यातील गळक्या जलवाहिनीमुळे रस्त्यावर चिखल नागरिक त्रस्त, शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
jaipur tanker blast injured people condition Bandages all over the body but viral video real or fake read fact check
जयपूरमधील स्फोटात होरपळलेल्या लोकांचे हाल? संपूर्ण शरीरावर बँडेज, धड चालताही येईना, पण या व्हायरल व्हिडीओची खरी बाजू पाहा
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय

या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “जेव्हा नदी आकाशाला भेटते…”, असे त्याने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे. याबरोबरच त्याने उत्तराखंड, ट्रेकिंग, फिटनेस असे काही हॅशटॅगही दिले आहेत.

त्याच्या या फोटोवर अनेकजण कमेंट करताना दिसत आहेत. अनेकांनी या फोटोवर कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी यावर फायर इमोजी शेअर केले आहेत.

आणखी वाचा : एका रात्रीत ‘या’ कामातून २० ते ३० लाख रुपये कमावतो ओरी; खुलासा करत म्हणाला, “माझ्या स्पर्शानंतर…”

दरम्यान आकाश ठोसर लवकरच तो ‘बाल शिवाजी’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

Story img Loader