मराठमोळा अभिनेता आकाश ठोसर त्याच्या आगामी ‘घर बंदूक बिरयाणी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘सैराट’, ‘झुंड’ या चित्रपटांनंतर आकाश आता नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आकाश सध्या ‘घर बंदूक बिरयाणी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.

‘घर बंदूक बिरयाणी’ चित्रपटाच्या टीम प्रमोशनसाठी पंढरपुरात दाखल झाली आहे. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी ‘घर बंदूक बिरयाणी’च्या टीमने ‘एबीपी माझा’शी संवाद साधला. “या चित्रपटाकडून काय अपेक्षा आहेत”, असा प्रश्न आकाशला विचारण्यात आला. आकाश उत्तर देत म्हणाला, “सैराटनंतर बऱ्याच दिवसांनी मी नागराज मंजुळे अण्णांबरोबर काम करत आहे. सजायी सर, सायली आणि बरेच नवोदित कलाकार या चित्रपटात आहेत. त्यांच्याबरोबर काम करताना फार मजा आली. हा चित्रपट एका वेगळ्या धाटणीचा आहे. हा चित्रपट म्हणजे धमाक्याचं पॅकेज आहे”.

हेही वाचा>> २०व्या वर्षी केसगळतीमुळे अक्षय खन्नाने करिअरमधून घेतलेला ब्रेक; स्वत:च केलेला खुलासा, म्हणाला “टक्कल पडल्यामुळे…”

पुढे आकाश म्हणाला, “गेले १५ दिवस आम्ही प्रमोशनसाठी महाराष्ट्र दौरा करत आहोत. पांडुरंगाचं दर्शन घेतल्यामुळे छान व सकारात्मक वाटतंय. सैराटआधी मी खूप साधा राहायचो. मी नेहमी मित्रांबरोबर एकादशीला इथे यायचो. आज खूप छान दर्शन झालं. या चित्रपटालाही असेच आशीर्वाद मिळो”.

हेही वाचा>> Video: ढोलवादन, लेझीम अन्…; डोंबिवलीच्या शोभायात्रेत आकाश व सायलीचा जलवा, व्हिडीओ व्हायरल

२०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘सैराट’ चित्रपटातून आकाश ठोसरने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने आकाशला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ‘झुंड’ चित्रपटातही तो झळकला होता. आता ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटाच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. या चित्रपटात आकाशबरोबर सायली पाटील, सयाजी शिंदेही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader