मराठी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप उमटवणारा, सुपरस्टार अंकुश चौधरी लवकरच एका नव्या दमदार भूमिकेत झळकणार आहे. ‘पी.एस.आय. अर्जुन’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सोशल मीडियावर जाहीर करण्यात आली असून ९ मे २०२५ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थांब म्हटलं की थांबायचं अशी चित्रपटाची टॅगलाईन असल्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता पाहायला मिळतेय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोशन पोस्टरमध्ये अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतला पी एस आय चा लूक पाहायला मिळत आहे, जो चित्रपटाच्या कथानकाविषयी अधिकच उत्सुकता निर्माण करणारा आहे. चाहत्यांना पहिल्यांदाच अंकुश चौधरी एका दमदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये अर्जुनचा करारी आणि धाडसी लूक दिसत असून प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे.

अंकुशने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यापूर्वी प्रेक्षकांनी अंकुशला रोमँटिक, ॲक्शन हिरोच्या अंदाजात पाहिले आहे. मात्र या चित्रपटात अंकुश एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. सध्या तरी या चित्रपटात कोण कलाकार झळकणार हे समोर आले नसले तरी लवकरच याबद्दलची माहिती प्रेक्षकांसमोर येईल.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्रीला १९ व्या वर्षी मिळाली PhD डिग्री, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, “पैसे देऊन घेतली…”

पीएसआय अर्जुन चित्रपटाचे पोस्टर

व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित विक्रम शंकर प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शक भूषण पटेल आहेत तर विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.