अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ते ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मुळे चांगलेच चर्चेत आहेत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मध्ये पौर्णिमा गायकवाड यांच्या वडिलांची भूमिका त्यांनी साकारली आहे. सीरिजच्या तिसऱ्या भागाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर अतुल कुलकर्णी अलीकडेच एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य, फिटनेस आणि त्यांनी बाहेरगावी खाल्लेले विचित्र पदार्थ कोणते आहेत याबाबत सांगितले.

हेही वाचा : डोक्यावर टक्कल अन् हटके लूक! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलंत का? व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “शाहरुखच्या जवानसाठी…”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या

अतुल कुलकर्णींनी ‘कर्ली टेल्स’च्या लोकप्रिय ‘तेरे गली मैं’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांना तुम्ही कधी, कोणता विचित्र पदार्थ खाल्ला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत अभिनेते म्हणाले, “मी बेडकाचे पाय ( फ्रॉग्स लेग) खाल्ले आहेत. काही जणांना नाव ऐकून विचित्र वाटले असेल पण, हा पदार्थ बाहेरगावी एकदम कॉमन आहे. लोक सर्रास हा पदार्थ खातात. मी बेडकाचे पाय बुडापेस्टला गेलो होतो तेव्हा खाल्ले होते, मला ती डिश खूप आवडली. जेव्हा ऑस्ट्रेलिया गेलो होते तेव्हा मी कांगारू खाल्ला होता आणि एकदा मगर सुद्धा खाल्ली आहे. हे सगळे पदार्थ आपल्यासाठी विचित्र आहेत. पण, बाहेरगावी असेच पदार्थ मिळतात.”

हेही वाचा : “तिकीट काढून स्वत:चे चित्रपट पाहतोस का?” चाहत्याच्या प्रश्नाला शाहरुख खानने दिले भन्नाट उत्तर; म्हणाला…

मुंबईतील प्रसिद्ध पदार्थांविषयी विचारले असता अतुल कुलकर्णी म्हणाले, मला वडापाव फारसा आवडत नाही. “मी वडापाव खाणं जाणूनबुजून टाळतो. वडापावचं नव्हे मी कोणतेही तेलकट पदार्थ खात नाही.”

हेही वाचा : सुयश टिळकच्या पत्नीची लोकप्रिय हिंदी मालिकेत होणार एण्ट्री; आयुषी अनुभव शेअर करत म्हणाली…

अतुल कुलकर्णी फिरण्याच्या आवडीविषयी सांगतना म्हणाले, “मला फिरण्याची प्रचंड आवड आहे. बहुतांश युरोप मी एकटा फिरलोय… तिकडचे लोकल कॅफे मला प्रचंड आवडतात. माझ्या मानसिक समाधानासाठी मी शक्यतो बाहेरच्या देशांमधील छोटी गावं किंवा जास्त लोकवस्ती नसते अशा ठिकाणी जातो.”

Story img Loader