नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये गाजलेलं नाव म्हणजे भरत जाधव. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. मात्र गेली अनेक वर्षे ते सिनेसृष्टीपासून दूर आहेत. मात्र आता लवकरच भरत जाधव सिनेसृष्टीत पुन्हा पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. भरत जाधव लवकरच एका चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसेच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे भरत जाधव बऱ्याच वर्षांनी मोठ्या आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच या चित्रपटासाठी रॅप गायन देखील केलं आहे.
आणखी वाचा : “दुसरं लग्न कधी करणार?” तेजस्विनी पंडित म्हणाली, “माझ्या आयुष्यात पुरुष…”

Kangana Ranaut criticism that Priyanka Gandhi has no respect for democracy
प्रियंका गांधीना लोकशाहीचा आदर नाही,कंगना रानौतची टीका..
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
subhash ghai reveals success secret
कलाकृतीत भारतीयत्व असेल तर ती दीर्घकाळ यशस्वी ठरते, दिग्दर्शक सुभाष घई यांनी उलगडले त्यांच्या यशामागचे इंगित
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Earnings of the sequel Singham Again and Bhool Bhulaiyaa 3 mumbai
दोन ‘सिक्वेल’च्या घवघवीत यशाने चित्रपटसृष्टीची दिवाळी गोड
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?

‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे शूटींग भारतात तसेच लंडनमध्ये करण्यात आले आहे. या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या एका नाटकावरून ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट प्रेरित आहे. या चित्रपटाची कथा आदिती आणि रावी या लंडनमध्ये राहणाऱ्या दोन सख्ख्या बहिणींची आहे. आपल्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना अनेक अडी-अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यावेळी ज्या दिव्यातून त्यांना जावं लागतं त्याची कथा म्हणजे लंडन मिसळ. या चित्रपटात नाटक, अभिनय, संगीत, नृत्य, खळखळून हसवणारे विनोद आणि झणझणीत मिसळ याची जुगलबंदी अनुभवायला मिळणार आहे.

येत्या ८ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात भरत जाधव एका हटके भूमिकेत दिसणार आहेत. तसेच यात ऋतुजा बागवे, रितिका श्रोत्री, माधुरी पवार, गौरव मोरे, निखील चव्हाण, ऋतुराज शिंदे आणि सुनील गोडबोले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘लंडन मिसळ’ या चित्रपटाचे निर्माते अमित बसनेट, सुरेश गोविंदराय पै आणि आरोन बसनेट आहेत. तर सह-निर्माते सानिस खाकुरेल आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शक जालिंदर कुंभार यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. तर सह-दिग्दर्शन वैशाली पाटील यांनी केले आहे. याचे पटकथा-संवाद ओमकार मंगेश दत्त यांचे आहेत.

आणखी वाचा : ‘झिम्मा २’ चित्रपटातून सोनाली कुलकर्णी, मृण्यमी गोडबोलेची एक्झिट? नव्या पोस्टरमुळे चर्चांना उधाण

वैशाली सामंत,रोहित राऊत,वैष्णवी श्रीराम यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे. तर ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाच्या संगीताच्या माध्यमातून रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या साई-पियुष या संगीतकारांच्या जोडीनं ‘लंडन मिसळ’ चित्रपटाचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं आहे. या चित्रपटाची गाणी मंदार चोळकर, मंगेश कांगणे आणि समीर सामंत यांनी लिहिली आहेत. वैशाली सामंत, भरत जाधव, राधा खुडे, मुग्धा कऱ्हाडे, वैष्णवी श्रीराम यांच्या सुमधुर आवाजातील गाणी रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.