हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, निर्मिती सावंत, सायली संजीव, शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकत आहेत. नुकतंच या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता चिन्मय मांडलेकरने एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यात त्याने झिम्मा २ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. याबरोबर त्याने चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत.
आणखी वाचा : “कथा कशी मांडावी…”, ‘झिम्मा २’ पाहिल्यानंतर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाला “मी लेखक नसल्याने…”

“हेमंत ढोमे, क्षिती जोग खूप खूप शुभेच्छा. हा झिम्मा आधीपेक्षा जास्त दंगा घालणार”, असे चिन्मय मांडलेकरने म्हटले आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

chinmay mandlekar jhimma
चिन्मय मांडलेकरची पोस्ट

आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रियुनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’

दरम्यान करोना काळानंतर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट म्हणून ‘झिम्मा’ कडे पाहिले जाते. ‘झिम्मा’ या चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता ‘झिम्मा २’ हा चित्रपट प्रदर्शितझाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.