‘एक वेगळी दुनिया एक वेगळीच दुनियादारी’ असे म्हणत ‘दुनियादारी’ हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात खूप गाजला. संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी’ या चित्रपटाने आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन दहा वर्षे पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने अभिनेता चिन्मय मांडलेकरने एक पोस्ट शेअर केली आहे.

चिन्मय मांडलेकरने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने ‘दुनियादारी’ या चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्याच्या या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा : बजेट फक्त ५ कोटी, कमाई मात्र दहापट; ‘बाईपण भारी देवा’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, कमावले इतके कोटी

चिन्मय मांडलेकरची पोस्ट

‘’तेरी मेरी यारी, भोकात गेली दुनियादारी’ दुनियादारीच्या संहितेच्या पहिल्या नरेशन मध्ये मी लिहिलेली ही पहिली ओळ वाचली तेंव्हाच समस्तांस वाटलं होतं की ‘ही दुनियादारी हिट आहे’.

जितेंद्र जोशी, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे, अमित राज, पंकज पडघन, तुम्हा सगळ्यांनी कागदावरचं पडद्यावर जे जीवंत केलंत ते अमर झालं. सह लेखक वैभव चिंचाळकर तू खूप कमाल आहेस.

त्याबरोबरच संजय जाधव दादा, तुमचे रील्स हिट आहेत, तुमची ‘दुनियादारी’ Blockbuster राहिल! #10yearsofduniyadari #decadeofduniyadari #duniyadari, असे चिन्मय मांडलेकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : प्रत्येकीला वेगळा रंग, ब्लाऊजवर विशिष्ट संदेश अन्…; ‘बाईपण भारी देवा’मधील ‘मंगळागौर’ गाण्यासाठी वापरलेल्या साड्यांची ‘ही’ आहे खासियत

दरम्यान ‘दुनियादारी’ या चित्रपटात स्वप्निल जोशी, अंकुश चौधरी, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक झाले. ‘दुनियादारी’ हा चित्रपट त्यातील पात्र आणि कलाकारांमुळे गाजला. या चित्रपटामुळे अनेक कलाकारांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती.