छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून चिन्मय उदगीरकरला ओळखले जाते. ‘स्वप्नांच्या पलीकडले’,’नांदा सौख्य भरे’ आणि ‘घाडगे & सून’ या मालिकांमधून चिन्मयने प्रत्येक मराठी कुटुंबाच्या घरात स्थान मिळवलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला त्याची अफाट लोकप्रियता पाहायला मिळते. सध्या तो ‘आतुर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाच्या चित्रीकरणाचा किस्सा सांगितला आहे.
‘आतुर’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणाऱ्या प्रीती मल्लापुरकरने नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चिन्मय उदगीरकर, प्रीती मल्लापुरकर, प्रणव रावराणे नाचताना दिसत आहे. यात ते तिघेही ‘कच्चा बदाम’ या गाण्यावर रिल करताना दिसत आहेत. मात्र अचानक त्यांचे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील याठिकाणी येतात आणि ते त्यांना ओरडताना दिसत आहेत.
आणखी वाचा : Video : सुयश टिळक झळकणार नव्या मालिकेत, पहिला लूक आला समोर
“मी चिन्मयला सांगत होते.. सेटवर रील शूट करायला नको director ओरडतात… आणि तसच झालं…”, असे कॅप्शन प्रीती मल्लापुरकरने या व्हिडीओला दिले आहे. प्रीती मल्लापुरकर यांनी याबद्दलचा एक किस्साही सांगितला आहे.
“आम्ही एक सीनचे शूटींग करत होतो. त्यावेळी प्रणव रावराणेच्या डोक्यात एक कल्पना आली. तो म्हणाली की ‘आजकाल कच्चा बदाम हे गाणं खूप व्हायरल होतंय, तर त्यावर आपण डान्स करु’. त्याने चिन्मयला ही संकल्पना सांगितली. ते दोघं रील बनवायला गेले. मी ते व्हायरल रीलही बघितलं नव्हतं. पण त्या दोघांना नाचताना बघून मीही त्यांच्यात सहभागी झाले.
पण आम्ही ते रील करत असताना मध्येच शिवाजी लोटन पाटील सर आले. त्यांनी आम्हाला ‘तुम्हाला रील बनवायचे पैसे थोडीच दिलेत. अभिनय करायचे पैसे दिले आहेत’ हे सगळं कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्डही केलं”! असे म्हटले”, असा किस्सा प्रीती मल्लापुरकर यांनी सांगितला. दरम्यान ‘आतुर’ हा चित्रपट ३ नोव्हेंबरपासून प्रदर्शित होत आहे.