मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमेला ओळखले जाते. तो कायमच विविध धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच तो चित्रपटसृष्टी, सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत असतो. लवकरच त्याचा ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच त्याने मराठी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर भाष्य केलं आहे.
हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये मराठीमधील नावाजलेल्या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक हेमंत ढोमेने माध्यमांना दिलेल्या एका मुलाखत दिली आहे. तेव्हा त्याला असं विचारण्यात आले की, “हा चित्रपट इतका छान आहे. इतर आधीच्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाकडून किती अपेक्षा आहेत?” यावर हेमंत ढोमे म्हणाला, “अशी अपेक्षा मी कधीच करत नाही. मी त्या स्पर्धेत रमत नाही. मला इतकंच वाटतं आपण चित्रपट केला तो प्रेक्षकांपर्यंत पोहचला आणि प्रेक्षकांनी त्यातुन काय प्रतिक्रिया दिली यातून आपण पुढच्या चित्रपटाच्या तयारीला लागतो. मी किती कोटी, किती शो, किती चित्रपटगृह मिळाली यात रमत नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
“तो आमच्या शेतात आला अन्….” चाहत्याच्या ‘त्या’ कृतीवर यामी गौतमीने व्यक्त केली खंत
ट्रेलरमध्ये साताऱ्यात राहणारा एक सामान्य मुलगा हिरो बनण्याचे स्वप्न बघतो. ते पूर्ण करण्यासाठीची त्याची मेहनत, त्याचा सामान्य मुलगा ते हिरो बनण्यापर्यंतचा खडतर प्रवास या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्याच्या हेतूने हा चित्रपट बनवण्यात आला आहे.
या चित्रपटात सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, अनिकेत विश्वासराव, नेहा महाजन, कमलेश सावंत अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या ३ मार्चला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.