मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत एक पोकळी निर्माण झाली आहे. ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे सोमवार २४ जुलैला निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यातच प्रसिद्ध अभिनेते, निर्माते मंगेश देसाई यांनी जयंत सावरकरांच्या निधनाबद्दल मोठे विधान केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयंत सावरकर यांच्या निधनानंतर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंगेश देसाई यांनी प्रसारमाध्यांसमोर अण्णांबद्दलच्या आठवणीत ताज्या केल्या. “अण्णांनी अनेक मालिका, चित्रपटात काम केले होते. त्यांची एक विशेष गोष्ट म्हणजे, त्यांना एखादा रोल आवडला तरच त्यासाठी ते होकार द्यायचे. अण्णांनी पैशांसाठी कधीच काम केलं नाही. मला हा रोल आवडलाय, यात मला काही तरी वेगळं करण्यासारखं आहे, म्हणून मी हा रोल करतोय, असं ते कायम म्हणायचे”, असे मंगेश देसाईंनी सांगितले.

आणखी वाचा : Video : “माणसं नेटवर्कमध्ये आहेत, पण कोणी…” जयंत सावरकरांचा आईसोबतच्या संभाषणाचा ‘तो’ व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी!

“अण्णांचा हजरजबाबी स्वभाव, त्यांची एनर्जी देवाला कुठे तरी पाहावीशी वाटली. कारण १२ जुलैला त्यांनी एक वडा खाल्ला. त्यामुळे त्यांना अॅसिडिटी झाली. १३ जुलैला ते जेवले नाहीत आणि १४, १५ जुलैदरम्यान त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

मी आता कौस्तुभशी बोललो. त्यावेळी ते कौस्तुभला म्हणाले की “माझी आता पॅकअप होण्याची वेळ आली आहे. सर्वांना कळवं.” या माणसाला सर्वच ज्ञात होतं किंवा त्यांना जाणवलं होतं. कारण त्यांच्याकडे पाहिल्यावर कधीही वाटलं नाही, ते आजारी आहेत किंवा अनफिट आहेत. या वयातला इतका उत्तम अभिनेता रंगभूमीवरुन जाणं हे रंगभूमीला पोकळी निर्माण करणारं आहे”, असेही मंगेश देसाईने म्हटले.

आणखी वाचा : “१७ ते १८ पानांचा एक सीन, बारा तास शूटींग अन्…” मिलिंद गवळींनी सांगितल्या ‘अण्णां’च्या आठवणी, म्हणाले “अंत्यसंस्कार करुन…”

दरम्यान जयंत सावरकर यांनी मराठी चित्रपट, नाटक, मालिका यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. वयाच्या विसाव्या वर्षी, १९५४ सालापासून त्यांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या), अवध्य (नाचणे), आम्ही जगतो बेफाम (चिवटे),एकच प्याला (तळीराम) यांसारख्या अनेक दर्जेदार मराठी नाटकात त्यांनी काम केले.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor director mangesh desai talk about jayant savarkar passes away last day eat vadapav nrp